माळशिरस तालुका वकिल संघटनेच्या “सचिव” पदी ॲड सुमित सावंत यांची बिनविरोध निवड…

टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क
माळशिरस तालुका वकिल संघटनेच्या सन 2025-26 या निवडणुकीत “सचिव” पदासाठी ॲड सुमित सावंत यांची बिनविरोध निवड झाली असून या निवडणुकीत विशेष म्हणजे अध्यक्ष,उपाध्यक्ष,सहसचिव,खजिनदार या पदांवर निवडणुकीची प्रक्रिया सुरू असताना “सचिव” पदासाठी फक्त ॲड सावंत यांचाच अर्ज दाखल झाल्याने आज दिनांक 25 सप्टेंबर 2025 रोजी छाननीनंतर त्यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली…
उर्वरित सर्व पदांसाठी 14 ऑक्टोबर रोजी मतदान पार पडणार असल्याची माहिती टाइम्स 9 न्यूज च्या सुत्रांनी दिली…
ॲड सुमित सावंत हे माळशिरस तालुक्यात नामवंत वकिल म्हणून परिचित असून त्यांनी अनेक सामाजिक संस्था तसेच विविध राजकीय पक्षांचे कायदेशीर सल्लागार म्हणून काम केले आहे.ते भारत सरकारचे “नोटरी” म्हणूनही कार्यरत आहेत.
वकिली क्षेत्रात अल्पावधीतच आपले नावं सर्वदूर पसरवणाऱ्या ॲड सुमित सावंत यांची “सचिव” पदी बिनविरोध झालेल्या निवडीबद्दल तालुक्यातील वकिल बांधवांसह विविध क्षेत्रातून त्यांचे अभिनंदन होत आहे.
या वेळी आर पी आयचे मिलिंद (नाना) सरतापे,युवक मित्र जुल्करभाई शेख,ॲड गोपाळ लावंड,टाइम्स 9 अकलूजचे आमीर मोहोळकर,टॉक 18 चे अण्णा भोसले,क्रांतिवीर न्यूज चे तुषार केंगार सह ॲड सुमित सावंत यांच्या अनेक मित्रांनी भ्रमणध्वनी द्वारे आणि प्रत्यक्षात भेटून त्यांना शुभेच्छा दिल्या…



