महाराष्ट्र

सालसे ग्रामस्थांच्या वतीने नूतन पीएसआय हरिदास पवार यांचा सत्कार संपन्न

करमाळा प्रतिनिधी अलीम शेख मोबाईल नंबर 98 50 68 63 60

सालसे, ता.करमाळा येथील शेतकरी सुब्राव उत्तम पवार यांचा मुलगा हरिदास सुब्राव पवार यांची लोकसेवा आयोग २०२२ च्या परीक्षेत पोलीस उपनिरीक्षक पदावर निवड झालेली असल्यामुळे त्यानिमित्ताने सालसे ग्रामस्थांनी तुळजाभवानी मंदिराच्या सभामंडपात भव्य असा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महात्मा फुले समाज सेवा मंडळ, करमाळा चे अध्यक्ष व जेष्ठ समाजसेवक प्रमोद झिंजाडे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून उद्योजक दशरथ घाडगे व ऊदयोजक सुनील कदम आणि ऊदयोजक सतीश रुपनर हे ऊपस्थित होते.

या वेळी सालसे गावातून हरिदास यांची घोड्यावरू वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली या सत्कार समारंभ कार्यक्रमात महात्मा फुले समाज सेवा मंडळाचे अध्यक्ष प्रमोद झिंजाडे यांनी प्रशासनात काम करत असताना प्रमाणिकपणे सेवा करण्याचे आवाहन केले या वेळी अभिनव भारत समाज सेवा मंडळाचे अध्यक्ष संतोष राऊत,अलिकॉन कंपनीचे संतोष काळे, गणेश देवकर,लाल बहाद्दूर शास्त्री विद्यालय च्या मुख्याध्यापिका मनिषा तनपुरे, जि.प.शाळेच्या मुख्याध्यापिका शितल कांबळे, ऊदयोजक सतीश रूपनर,विस्तार अधिकारी योगेश जगताप,यशश्री क्लासेसचे मालक तानाजी लोकरे,बाबासाहेब शेळके यांनी मार्गदर्शन केले,

यावेळी नूतन पोलिस ऊपनिरीक्षक हरिदास पवार यांनी मी परिक्षेत कसे यश संपादन केले व गरिब परिस्थीतीतून कसा अभ्यास केला या विषयावर मार्गदर्शन केले यावेळी हरिदास चे वडिल सुब्राव पवार व आई मीना पवार सह चुलते वालचंद पवार व चूलती सुनिता पवार यांचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला, राजीव गांधी सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने आय.ए.एस. बालाजी मंजूळे यांचा मागील काही वर्षापूर्वी सत्कार ठेवला होता त्यावेळी नूतन पी.एस.आय. हरिदास पवार हे आठवीला होते त्यावेळी आय.ए.एस. बालाजी मंजूळे यांचे मनोगत ऐकून व त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन हरिदास ने सातल्याने अभ्यास करून यश संपादन केले ,हरिदास ला शैक्षणिक जीवनात वृक्षाली सोरटे ,नवनाथ सातपुते,तानाजी लोकरे,ऊर्मिला पवार या शिक्षकासह जि.प.शाळा सालसे व लाल बहादूर शास्त्री विदयालय सालसे यांचे मार्गदर्शन मिळाले

यावेळी माजी सरपंच ज्ञानदेव हांडे,हारीभाऊ थोरे,राजू सपकाळ,दत्तात्रेय घाडगे, मनिषा बगाडे, विकास माळी, अजित कणसे, गावाचे पोलीस पाटील ऊर्मिला पवार ,तानाजी काकडे,महात्मा फूले समाज सेवा मंडळाच्या संचालिका वैशाली राऊत,दैवशाला काळे,तात्या आवटे, अभिनव भारत समाज सेवा मंडळ, चे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक सालगुडे,व्यापारी शरद पवार, नवनाथ पवार, अशोक पवार,ग्रा.सदस्य मधुकर हांडे,तानाजी काकडे,विटू हांडे,नानासाहेब काकडे,पै.भरत लोकरे , रविराज सालगुडे,अक्षय घाडगे ,बालाजी शेळके,दत्ताभाऊ ढोरे, संतोष ढोरे, अंकुश ढोरे, कुलदिप तळेकर.रोशेवाडी चे उपसरपंच सचिन शिंदे सालगुडे ,अनिल काळे,गौरव घाडगे,शुभम धनवे,शुभम कानडे,अरूण गवळी,मयूर काळे सह परिसरातील बहुसंखेने लोक ऊपस्थित होते
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सूरज पवार यांनी तर आभार तानाजी लोकरे यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button