सफाळे विराथन बुद्रुक जलसार भागातील बाधित घरमालकांना एल अँड टी कंपनी कडून तुटपुंजी नुकसान भरपाई…. ग्रामस्थ दाखल करणार कोर्टात दावा

टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत भ्रमणध्वनी क्रमांक :7030516640
पालघर जिल्ह्यातील सफाळे पश्चिम भागातील विराथन बुद्रुक टेंभीखोडावे जलसार ग्रामपंचायतीच्या हद्दीतील मेघराज डोंगरातून क्षमतेपेक्षा जास्त भूसुरंग स्पोर्ट घडवून आणून भुयारी बोगदा तयार करण्यात आला आहे.
हा भुयारी मार्ग मुंबई अहमदाबाद जलद गती बुलेट ट्रेन साठी एल अँड टी कंपनी मार्फत खोदण्यात आला आहे.
हा भुयारी बोगदा तयार करण्यासाठी क्षमतेपेक्षा जास्त भूसुरुंग स्पोर्ट करू नयेत म्हणून या भागातील ग्रामस्थांनी बुलेट ट्रेन प्रकल्प अधिकारी व एल अँड टी कंपनीच्या अधिकाऱ्यांना लेखी निवेदन देऊन आपापल्या ग्रामपंचायतीमार्फत विरोध दर्शवला होता.

असे असताना देखील या विरोधाला न जुमानता क्षमतेपेक्षा जास्त भुसुरंग स्फोट घडून आणल्यामुळे या भागातील किरईपाडा,तलावपाडा, विराथन बुद्रुक, जलसार,टेंभीखोडावे चिखलपाडा या गावांमधील 500 पेक्षा जास्त सिमेंट स्लॅबच्या पक्क्या नवीन घरांना भेगा जाऊन राहत्या घरांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
याबाबत गावकऱ्यांनी उद्रेक केल्यावर या बाधित घरांचे अधिकाऱ्यांनी री सर्वे करण्याचे गावकऱ्यांना पालघर प्रशासकीय अधिकाऱ्यांसमोर आश्वासन दिले होते.
परंतु हा रिसर्वे न करता ज्या घराची किंमत 25 लाख रुपये आहे. व या घराचे स्लॅब पडण्याच्या मार्गावर आहेत अशा घरमालकाला फक्त दोन लाख रुपये तर ज्या घराची किंमत 15 लाख रुपये आहे आणि घरातील सर्व भिंतींना भेगा जाऊन संपूर्ण फाउंडेशन खराब झाले आहे त्यांना फक्त 5 हजार रुपये तर नुसत्या घरांच्या भिंतींना मोठमोठ्या भेगा गेलेल्या घर मालकांना फक्त 450 रुपये नुकसान भरपाई अशी लिस्ट प्रसिद्ध करून बाधित घर मालकांना एल अँड टी कंपनीच्या वतीने ग्रामपंचायतीमार्फत तुटपुंजी रक्कम व चेक देण्यास सुरुवात करण्यात आली आहे .
मात्र या बाधित घरमालकांनी ही रक्कम घेण्यास नकार दिला असून येत्या काही दिवसात या कंपनीच्या विरोधात या भागातील ग्रामस्थ आणि बाधित घरमालक कोर्टात दावा दाखल करण्याच्या तयारीला लागली आहेत.



