अकलूज येथे उद्या ‘सामाजिक ऐक्य परिषद व कृतज्ञता पुरस्कार वितरण’ सोहळा.खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या हस्ते उद्घाटन; बहुजन सत्यशोधक संघाचा उपक्रम

Times 9 Marathi News Network
अकलूज : बहुजन सत्यशोधक संघाच्या वतीने रविवार, दि. १८ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ४ वाजता अकलूज येथील आई श्री रिसॉर्ट (नवीन एस.टी. स्टँडजवळ) येथे भव्य ‘सामाजिक ऐक्य परिषद व कृतज्ञता पुरस्कार वितरण सोहळा’ आयोजित करण्यात आला आहे. सामाजिक सलोखा, समता, बंधुता आणि संविधानिक मूल्यांचा प्रसार करणे हा या परिषदेचा मुख्य उद्देश आहे.
या कार्यक्रमाचे उद्घाटन माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार मा. धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या हस्ते होणार असून, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बहुजन सत्यशोधक संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. सुनील ओहोळ असणार आहेत.
या सोहळ्यास प्रमुख उपस्थिती म्हणून बाबासाहेब देशमुख (आमदार, सांगोला) अभिजित पाटील (आमदार, माढा)
राहुलजी वाघमोडे (स्वीय सहाय्यक, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे)
डॉ. एम. के. इनामदार (ज्येष्ठ हृदयरोगतज्ज्ञ) नंदकुमार कांगार (राष्ट्रीय अध्यक्ष – अ. भा. होलार समाज संघटना व राज्य संघटक – आरपीआय) प्रशांत बाबर (राज्य उपाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस – शरदचंद्र पवार) रमेश महाराज वसेकर (वंशज, संत सावता माळी महाराज) डॉ. अमीर मुलाणी (राष्ट्रीय सचिव, बहुजन सत्यशोधक संघ) आदित्य फत्तेपुरकर (व्यवस्थापक, राजमाता अहिल्याबाई होळकर संस्थान, इंदूर) हे मान्यवर उपस्थित राहणार आहे.

समाजातील विषमता दूर करून विविध जाती-धर्मांत सलोखा निर्माण करणे आणि सामाजिक, आर्थिक, राजकीय व धार्मिक क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा ‘कृतज्ञता पुरस्कार’ देऊन गौरव करणे हे या सोहळ्याचे वैशिष्ट्य आहे. समाजात स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्यायाची भावना अधिक दृढ करण्यासाठी ही परिषद सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीला नवीन दिशा देणारी ठरेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी बहुजन सत्यशोधक संघाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सौरभ वाघमारे, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष राजकुमार लांडगे, महाराष्ट्र कार्याध्यक्ष हेमंत कांबळे, प्रवक्ते महेंद्र लंकेश्वर, डॉ. विश्वास वाघमारे, जिल्हाध्यक्ष बापूसाहेब लोंढे, तालुकाध्यक्ष विनोद लोखंडे, युवक जिल्हाध्यक्ष अवि गायकवाड, युवा उपाध्यक्ष पांडुरंग चव्हाण, तालुका सचिव रवींद्र काकडे, तालुका उपाध्यक्ष महमद शेख, अकलूज शहर अध्यक्ष अशोक कोळी, जिल्हा उपाध्यक्ष युवा सावता नवगिरे, तालुका संपर्कप्रमुख रोहिदास तोरणे यांच्यासह सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत.
या सामाजिक ऐक्य परिषद व कृतज्ञता पुरस्कार सोहळ्यास नागरिक, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार आणि सर्व समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन बहुजन सत्यशोधक संघाच्या वतीने करण्यात आले आहे.



