शहर

सफाळे विराथन बुद्रुक ग्रामपंचायत हद्दीतील अभिनव विद्यालय शाळेत वृक्ष रक्षाबंधन उपक्रम संपन्न.

टाईम्स नाईन न्यूज नेटवर्क उपसंपादक विजय घरत
भ्रमणध्वनी क्रमांक -7030516640

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाच्या निमित्ताने शासनाने संपूर्ण देशभर आयोजित केलेल्या मेरी मिट्टी मेरा देश अभियानांतर्गत पर्यावरणाचा समतोल हे मुख्य उद्दिष्ट ठेवून वृक्ष हा मानवाचा प्राण आहे. या जाणिवेतून “झाडे लावा झाडे वाचवा” हा संदेश देण्याच्या उद्देशाने पालघर तालुक्यातील मेघराज शिक्षण संस्थेचे अभिनव विद्यालय विराथन बुद्रुक चाफेवाडी या शाळेत सालाबाद प्रमाणे मंगळवार दिनांक 29 ऑगस्ट 2023 रोजी वृक्ष संवर्धन करण्याच्या दृष्टीने रक्षाबंधन सणाचे औचित्य साधून शालेय विद्यार्थ्यांकडून शालेय परिसरातील वृक्षांना राखी बांधून पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्यात आला.

या उपक्रमात 5 पाचवी ते दहावीच्या प्रत्येक वर्गाने वर्ग शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विविध रंगांच्या तसेच विविध आकाराच्या कलात्मक राख्या तयार करून शालेय आवारातील झाडांना बांधून वृक्ष रक्षाबंधन साजरे केले. त्यावेळी शाळेचे मुख्याध्यापिका नेहा किणी, पर्यवेक्षक बाबुराव भोईर व अभिनव विद्यालयातील शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी व सर्व विद्यार्थी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button