महाराष्ट्र
कोडोलीत यशवंत शिक्षणशास्त्र महाविद्यालयात माजी सैनिक अशोक मोरे यांच्या हस्ते ध्वजारोहण.

टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क
कोडोली (ता.पन्हाळा) येथील यशवंत शिक्षणशास्त्र महाविद्यालयाच्या प्रांगणात येथील माजी सैनिक अशोक गणपती मोरे यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यशवंत शिक्षणशास्त्र महाविद्यालय आणि यशवंत उच्च माध्यमिक विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने हा समारंभ पार पडला. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. विश्वनाथ पाटील होते.यावेळी यशवंत उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य पंडित साळोखे यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रा.चंदाराणी उमेश पाटील यांनी प्रास्ताविकात पाहुण्यांची ओळख करून दिली.१२ वीच्या विद्यार्थिनी अंकिता शेटे आणि गौरी खवरे यांनी सूत्रसंचलन केले.



