निमा संघटना माळशिरस तर्फे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा

प्रतिनिधी – रियाज मुलाणी
मो.9921500780
दिनांक 9 मार्च 2024 रोजी निमा संघटना व निमा वूमेन्स फोरम अकलूज ता माळशिरस तर्फे जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून समाजातील विविध क्षेत्रातील कर्तबगार महिला व सर्व पॅथीच्या महिला डॉक्टर्स यांचा सन्मान करून जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात पारंपरिक वाद्य हलगी तुतारीच्या गजरात व पारंपरिक वेशभूषाचेप्रतीक असणारे फेटे बांधून महिलांचे स्वागत करण्यात आले . त्यानंतर महिला सक्षमीकरण व बेटी बचाव हा संदेश देत हवेमध्ये फुगे सोडत केक कापण्यात आला.

कार्यक्रमाचे अध्यक्षपद स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ सतीश दोशी यांनी भूषवले तर त्यावेळी त्यांच्यासोबत मंचावर डॉ तानाजी कदम, डॉ अंजली कदम , निमा चे अध्यक्ष डॉ अमोल माने , निमा वूमेन्स फोरमच्या अध्यक्षा डॉ विद्या एकतपुरे , IMA च्या डॉ रेवती राणे, IMA चे सचिव डॉ नितीन राणे, होमिओपॅथीक संघटनेचे अध्यक्ष डॉ अभिजित राजे भोसले , महिला होमीपओपॅथीक संघटनेच्या अध्यक्षा डॉ वैष्णवी शेटे या उपस्थित होत्या.
त्यानंतर महिला सक्षमीकरण व महिलांचे आरोग्य या विषयावर पुण्यातील सुप्रसिद्ध स्त्रीरोग तज्ञ् व व्याख्याता डॉ पूजा कोटस्थाने यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते . समाजातील विविध क्षेत्रामध्ये अग्रेसर असणाऱ्या महिलांचा प्रतिनिधिक स्वरूपामध्ये सत्कार करण्यात आला यामध्ये
1 )सौ .सविता कदम (अध्यक्ष, कदम गुरुकुल इंदापूर)
2)सौ. प्रिया नागणे (अध्यक्ष, रोटरी क्लब अकलूज)
3)सौ.शीतल हर्षवर्धन गायकवाड (तहसीलदार )
4)सौ. वैष्णवी काळे (सुप्रसिद्ध चित्रकार )
5)डॉ.सौ . प्रियांका शिंदे महाडिक (तालुका वैद्यकीय अधिकारी ,माळशिरस )

त्यानंतर कार्यक्रमाचे मुख्य प्रायोजक असणारे केअर मदरचे शंतनू पाठक यांनी एन एस टी मशीन सादरीकरण केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ अश्विनी राऊत व डॉ सुरभी देशमुख यांनी केले . प्रास्ताविक डॉ दिलीप पवार यांनी केले तर आभार डॉ विद्या एकतपुरे यांनी मानले .
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संघटनेचे सचिव डॉ दादासाहेब पराडे, संघटनेचे प्रसिद्धी प्रमुख डॉ प्रशांत निंबाळकर व संघटनेचे उपाध्यक्ष डॉ हर्षवर्धन गायकवाड तसेच संघटनेचे सर्व पदाधिकारी व निमा वूमेन्स फोरमच्या डॉ कविता पाटील, डॉ रुपाली पराडे,डॉ उर्मिला पाटील,डॉ स्वाती जगताप तसेच सर्व कार्यकारिणी सदस्य यांचे विशेष सहकार्य लाभले..
कार्यक्रमासाठी डॉ सविता गुजर, डॉ प्रिया कदम, डॉ मानसी देवडीकर ,डॉ मानसी इनामदार, डॉ मनीषा शिंदे तसेच डॉ शिरीष रणनवरे,डॉ उदय माने देशमुख, डॉ हरिश्चंद्र सावंत ,डॉ नंदकुमार जगताप, डॉ रोहित देशमुख, डॉ अनिस शेख ,डॉ फारुख शेख ,डॉ गणेश मुंडफणे, डॉ रोहित भगत, डॉ प्रकाश बनकर डॉ असिफ शेख व तालुक्यातील विविध भागातून आलेले सर्व डॉक्टर मोठ्या संख्येने उपस्थित होते