पश्चिम रेल्वेच्या सफाळे रेल्वे फाटकाचे नुकसान करणाऱ्या वाहतूकदारा विरुद्ध रेल्वे पोलिसांनी कारवाई करून वसूल केला 5 हजार रुपयांचा दंड

टाईम्स 9 मराठी न्युज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत. भ्रमणध्वनी क्रमांक : 7030516640
भरधाव वेगाने रेल्वे फाटक क्रॉस करून रेल्वे फटकाचे नुकसान करणाऱ्या पिकअप टेम्पो चालका विरुद्ध सफाळे रेल्वे पोलिसांनी कारवाई करून या टेम्पोचालकाकडून 5 हजार रुपयांची दंड वसूल केली आहे.ही घटना शनिवार दिनांक 1 मार्च 2025 रोजी संध्याकाळी 7.20 वाजता पश्चिम रेल्वेच्या सफाळे रेल्वे फाटकात घडली आहे.

MH-46-CL- 4837 हा पांढऱ्या रंगाचा महिंद्रा पिकअप टेम्पो घेऊन कीरेंद्र सिंह राठोड वय वर्ष (38) हा वाहतूकदार शनिवार दिनांक 1 मार्च रोजी भरधाव वेगाने सफाळे पूर्व येथून पश्चिम सफाळे येथे जाण्यासाठी निघाला असताना रेल्वे फाटक बंद होत असताना या वाहतूकदाराने नियमांचे उल्लंघन करून आपला पिकअप टेम्पो रेल्वे फाटकातून भरधाव वेगाने नेत असताना रेल्वे फाटकाला ठोकर देऊन सरकारी मालमत्तेचे नुकसान केले यावेळी आपल्या कर्तव्यावर दक्ष असलेले रेल्वे पोलीस उपनिरीक्षक हरी तमांग व सफाळे रेल्वे स्टेशन मास्तर यांनी घटनास्थळी पाहणी करून या टेम्पो चालका विरुद्ध कायदेशीर कारवाई करून या टेम्पो चालकाकडून पाच हजार रुपयांची दंड वसूल केली आहे.