नाशिक सोनवणे यांच्या संपर्क कार्यालयाचे अकलूज येथे मोठ्या थाटामाटात उद्घाटन

आमीर मोहोळकर
टाइम्स 9 न्यूज,अकलूज
9890299499
अकलूज येथील सामाजिक आणि राजकीय चळवळीतील युवा कार्यकर्ते तसेच अकलूज नगर परिषद निवडणुकीतील प्रभाग क्रमांक 11 मधील अनुसूचित जाती पुरुष या जागेसाठी उभे असलेले लोकप्रिय उमेदवार नाशिक सोनवणे यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन काल रात्री युवक नेते सयाजीराजे मोहिते पाटील यांच्या हस्ते मोठ्या थाटामाटात पार पडले…
सध्याच्या घडीला महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू असून त्याच अनुषंगाने मोहिते पाटील गटाच्या वतीने सर्वात प्रथम उमेदवारी घोषित केलेले उमेदवार म्हणून प्रसिद्ध झालेले नाशिक सोनवणे यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन वेळी युवक मित्रांची उपस्थिती उल्लेखनीय अशीच होती…

सदरच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन वेळी युवक नेते सयाजीराजे मोहिते पाटील यांनी नाशिक सोनवणे यांना अकलूज नगर परिषद निवडणुकी साठी मिळालेल्या उमेदवारीच्या शुभेच्छा व्यक्त करत सर्व समाज घटकांना सोबत घेत चांगले कार्य आपल्या हातून घडो,अशा शुभेच्छा दिल्या…
या वेळी टाइम्स 9 न्यूज चे अकलूज प्रतिनिधि आमीर मोहोळकर यांच्याशी बोलताना नाशिक सोनवणे असे म्हणाले की,मोहिते पाटील परिवाराने माझ्यावर विश्वास ठेवत जी उमेदवारी मला दिली असून त्याचे चीज केल्याशिवाय राहणार नाही आणि येणाऱ्या काळात प्रभाग क्रमांक 11 मधील जनतेच्या हिताचे काम करण्यास माझे प्राधान्य राहील असे हि ते शेवटी म्हणाले…
या वेळी प्रभाग क्रमांक 11 मधील सर्वच कार्यकर्ते,वडिलधारी मंडळी यांच्या सह युवक वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होते,हे विशेष…



