महाराष्ट्र
” प्रजासत्ताक दिनानिमित्त कृषी कन्यांकडून माळीनगर येथे वृक्षरोपण”

प्रतिनिधि…. रियाज मुलाणी
मो.9921500780
महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्नित रत्नाई कृषी महाविद्यालय अकलूज ,तालुका - माळशिरस येथील कृषीकन्यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ,विश्वतेज नगर (माळीनगर )तालुका -माळशिरस येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त वृक्षरोपण कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात कृषी कन्यांनी वृक्षारोपणाची गरज व वृक्षारोपणाचे फायदे ग्रामस्थांना पटवून दिले .वृक्ष संवर्धन कसे करावे या विषयी मार्गदर्शन केले तसेच वृक्षरोपण करून निसर्गाचे संतुलन कसे करता येईल व वृक्ष संवर्धन केल्याने पर्यावरणाची होणारी हानी कशी टाळता येईल याबद्दल माहिती देण्यात आली.'झाडे लावा झाडे जगवा 'हा सामाजिक संदेश गावकऱ्यांना देण्यात आला. वृक्षरोपण या कार्यक्रम अंतर्गत वड, चिंच ,कनेर अशा विविध प्रकारची झाडे लावण्यात आली. हे कार्य मा. सौ.अनुपमा एकतपुरे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी कृषी सहाय्यक सौ. सारिका एकतपुरे, ग्रामपंचायत सदस्य विराजदादा निंबाळकर, शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती. छाया पोळ, सहशिक्षिका सौ.मनीषा भोसले व माळीनगर येथील ग्रामस्थ उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी सर्व ग्रामस्थांनी व शाळेतील विद्यार्थ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला.या कार्यक्रमाचे नियोजन कृषी कन्या स्नेहल तांबोळकर, ईशा घोगरे, प्रतीक्षा हेगडे, प्राची जाधव, कोमल लाड, प्रतिक्षा बनसोडे, जिजाऊ बरडे , सोनाली गायकवाड यांनी केले या कार्यक्रमास रत्नाई कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य आर.जी. नलवडे ,कार्यक्रम समन्वयक प्रा. एस. एम. एकतपुरे ,कार्यक्रम अधिकारी प्रा. एम. एम. चंदनकर व कार्यक्रम अधिकारी प्रा. एच. व्ही. कल्याणी यांनी मार्गदर्शन केले.