अल्पवयीन पीडितेच्या अत्याचार प्रकरणी एकाची निर्दोष मुक्तता

उपसंपादक ——-हुसेन मुलाणी टाइप्स 9 मराठी न्यूज नेटवर्क
उदयनगर येथील अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेवून अत्याचार करण्याचा प्रयत्न व ॲट्रॉसिटी कायद्यातून उदयनगर येथील अहमद शेख याची माळशिरस येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. एम. एन.पाटील यांनी निर्दोष मुक्तता केली.
घटनेची हकीकत अशी की , अल्पवयीन पीडित मुलगी ही शाळा सुटल्यानंतर घरी जात असताना तीस फूस लावून मोटार सायकल वर बसवून पळवून नेऊन ,उसाच्या शेतात नेवून कपडे काढण्याचा प्रयत्न करून तिच्याशी गैरवरतन करण्याचा प्रयत्न करू लागला,त्यावेळी आरोपीस धक्का मारून मुलगी उसतून पळून आली,तेथे असलेल्या दोन बायकांनी तिला घरी आणून सोडले,त्यानंतर अल्पवयीन पीडितेच्या आईने अकलूज पोलिस स्टेशन ला पोक्सो कायद्याअंतर्गत व ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला होता.
यावेळी सरकार पक्षाच्या वतीने 9 साक्षीदार तपासण्यात आले,यावेळी आरोपीच्या वतीने ॲड.वजीर शेख यांनी घटनास्थळाच्या विसंगती वरून व गुन्हा घडला नसल्याचा युक्तिवाद केला,तो युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपी नामे अहमद इस्माईल शेख यास मे.कोर्टाने निर्दोष मुक्त केले.
सरकार पक्षाच्या वतीने ॲड.संग्राम पाटील तर आरोपीच्या वतीने ॲड.वजीर शेख , ॲड.हसीना शेख, ॲड रणजित भोसले , ॲड सुयश सावंत व ॲड. शाहीन रफिक पठाण यांनी काम पाहिले