महाराष्ट्र

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ओझरे येथे नवागतांचे स्वागत संपन्न

बावडा प्रतिनिधी मोहंमद कैफ तांबोळी, मोबाईल – 8378076123

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ओझरे येथे शैक्षणिक वर्ष 2023-24 नवागतांचा प्रवेश उत्सव उत्साहात संपन्न झाला.

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ओझरे येथे नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात नवीन दाखल मुलांचे स्वागत करून करण्यात आली. यावेळी शाळेतील सर्व मुलांना नवीन गणवेश व पाठ्यपुस्तक यांचे वाटप करण्यात आले. शैक्षणिक वर्ष सुरू झाल्याने शाळा पूर्वतयारी मेळावा घेण्यात आला. याप्रसंगी सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत करून त्यांना खाऊ वाटप करण्यात आले.

कार्यक्रम तालुक्याचे गट शिक्षण अधिकारी अजिंक्य खरात यांचे प्रेरणेने व केंद्रप्रमुख सुनिता कदम मॅडम यांचे मार्गर्शनाखाली घेण्यात आला. यावेळी शाळेच्या प्रगती विषयी पालकांनी व ग्रामस्थांनी समाधान व्यक्त करत शिक्षकांचे कौतुक केले.

कार्यक्रमासाठी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सचिन शिंदे, पोलीस पाटील दिलिप रास्ते, महादेव ढेरे, सुनिल पालवे, शरद पालवे, नितीन रास्ते, विजय सोलनकर, नेताजी पवार, अभिषेक रlस्ते यांचे सह पालक व ग्रामस्थ उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक विजय पाटील यांनी केले तर आभार उपशिक्षिका निशा बगाड यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button