मोटर सायकल चोरी करणाऱ्या अट्टल गुन्हेगाराला पालघर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रदीप पाटील यांच्या पथकाने केले जेरबंद
टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत भ्रमणध्वनी क्रमांक :7030516640
पालघर रेल्वे स्टेशन परिसरातून मोटारसायकल चोरीला गेलेल्या गुन्ह्याचा तपास करत असताना पालघर पोलिसांच्या हाती अट्टल मोटारसायकल चोर लागला आहे विजय गोष वय वर्ष (43 राहणार ओम वास्तू, डोंगरपाडा, विरार पश्चिम) असे त्याचे नाव आहे. त्याच्या अटकेनंतर त्याने केलेल्या दोन गुन्ह्यांची उकल झाली आहे .
पालघरच्या कोळीपाडा येथे राहणाऱ्या रत्तिष भोपी आणि गिरनार रेसिडेन्सीमध्ये राहणाऱ्या मिलन अजित पंजाबी यांच्या रेल्वे स्टेशनजवळ पार्क केलेल्या मोटारसायकल चोरीला गेल्या होत्या या गुन्ह्यांचा तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पथक करत असताना मिळालेल्या माहितीवरून विजय गोषला विरार परिसरातून ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने मोटारसायकल चोरल्याची कबुली दिली आहे.
मूळचा उडीसामधील राऊरकेला येथील रहिवाशी असलेला विजय गोष हा मजूरीचे काम करायचा. त्यातूनच त्याने मोटारसायकल चोरण्यास सुरुवात केली होती. 15 ऑगस्ट 2024 रोजी त्याने पालघर रेल्वे स्टेशन परिसरातील पार्किंगच्या जागेत उभी असलेली रतिष भोपी यांची मोटारसायकल चोरली होती.
यात काहीच कारवाई न झाल्याने निर्वावलेल्या विजय गोषने पुन्हा 20 नोव्हेंबर 2024 रोजी पालघर रेल्वे स्टेशनच्या पार्किंग मध्ये उभी असलेली मिलन पंजाबी यांची मोटारसायकल चोरली होती. मोटारसायकल चोरीच्या या गंभीर गुन्ह्यांची दखल घेत पालघर जिल्हा पोलीस अधिक्षक बाळासाहेब पाटील यांनी दिलेल्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रविंद्र वानखेडे, हवालदार संदीप सरदार, दिनेश गायकवाड, राकेश पाटील या पथकाने तांत्रिक तसेच गोपनीय माहितीच्या आधारे तपास करत विजय गोषला विरार येथून अटक करून दोन्ही गुन्हे उघडकीस आणले आहेत.