सफाळे पोलीस ठाणे हद्दीत अंमली पदार्थाचे सेवन करणाऱ्या दोघांविरुद्ध एन डी पी एस कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल

टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत भ्रमणध्वनी क्रमांक :7030516640
सफाळे पोलीस ठाणे हद्दीत अंमली पदार्थाचे सेवन करणाऱ्या दोन तरुणांवर सफाळे पोलीस ठाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्ता शेळके यांच्या गस्त पथकाने शनिवारी अंमली पदार्थ व मनोविकारक द्रव्य प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल केले आहेत.
नशा मुक्ती भारत अभियान अंतर्गत पालघर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यतीश देशमुख आणि अपर पोलीस अधीक्षक विनायक नरळे तसेच पालघर उपविभागीय पोलीस अधिकारी विकास नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली सफाळे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्ता शेळके, पोलीस उपनिरीक्षक दीपविजय भवर, सहायक फौजदार कल्पेश किणी, व पोलीस हवालदार शिवाजी चिमकर यांचे पथक शनिवार दिनांक 17 जानेवारी रोजी सफाळे पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त व प्रतिबंधात्मक कारवाई करत असताना सफाळे पोलीस ठाणे हद्दीत सत्यकुमार हिरालाल राजभर (25) , व सलमान शरीफ शेख ( 25) दोघेही राहणार सफाळे नंदाडे संशयास्पद हालचाली करत असताना दिसून आल्यावर सदर तरुणांना ताब्यात घेऊन त्यांची कायदेशीर व वैद्यकीय सखोल चौकशी केली असता त्यांनी अमली पदार्थाचे सेवन केल्याचे निष्पन्न झाल्यावर त्यांच्या विरुद्ध सफाळे पोलीस ठाण्यात अंमली पदार्थ व मनोविकारक द्रव्य प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.



