सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या सफाळे येथील सुमन मानकर नारीशक्ती गौरव पुरस्काराने सन्मानित
टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत भ्रमणध्वनी क्रमांक -7030516640
जनहित फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य आणि संघर्ष नायक मीडिया 2024 यांच्या तर्फे सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांच्या कार्याचा सन्मान करण्याकरिता नवरात्रीनिमित्त नुकताच वसई येथे राज्यस्तरीय पुरस्कार आयोजित करण्यात आला होता.
यावेळी सफाळे येथील संघर्ष संघटना महाराष्ट्रच्या अध्यक्षा सुमन मानकर यांना “नारीशक्ती गौरव” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे .
मागील तीस वर्षापासून त्या संघर्ष समितीच्या माध्यमातून महिलांचा सर्वांगीण विकास करणे, तरुणांसाठी रोजगार मेळावे आयोजित करणे, मार्गदर्शन शिबिर भरवणे, तसेच गोर-गरीब अन्यानग्रस्तांच्या न्याय-हक्कांसाठी विविध आंदोलनाच्या माध्यमातून पाठपुरावा करणे, महिलांचे सबलीकरण करणे अशा विविध सामाजिक कार्यात त्यांनी मोलाचे योगदान दिले आहे. त्यांच्या याच कार्याची दखल घेत जनहित फाऊंडेशन या संस्थेने वतीने त्यांना ‘नारीशक्ती गौरव’ पुरस्कार देण्यात आला.
आपण समाजाचा एक भाग आहोत आणि माणूस म्हणून आपल्यावर समाजाचं ऋण असतं. ते यथाशक्ती फेडता यावे या भावनेने प्रेरित होऊन मी काम करीत आहे असे त्यांनी यावेळी मनोगताततून सांगितले.
जनहित फाऊंडेशनच्या नारीशक्ती गौरव पुरस्काराने पुढील कार्य करण्यास अधिक बळ प्राप्त झाले आहे. अशी भावना ही त्यांनी पुढे बोलताना व्यक्त केली. या कार्यक्रमास जेष्ठ स्त्रीरोग तज्ञ तसेच नालासोपारा आयुर्वेदिक महाविद्यालयाच्या विश्वस्त डॉ.ऋतुजा दुबे, संघर्ष नायक मीडिया चे संपादक आठवले, जेष्ठ विचारवंत, पत्रकार गंगाधर म्हात्रे, संस्थेचे अध्यक्ष उमेश जामसंडेकर आदी विविध मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमात वसई, पालघर, डहाणू, वाडा, ठाणे, जव्हार, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर अश्या अनेक ठिकाणी कार्यरत असणाऱ्या शिक्षक, वकील, डॉक्टर, उद्योजक, महिला सबलीकरण, अशा विविध सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.