मॉडेल विविधांगी प्रशालेच्या गरजू मुलींना रोटरी क्लबचे वतीने सायकलचे वाटप
प्रतिनिधी- रियाज मुलाणी
मो.9921500780
माळीनगर (ता. माळशिरस) येथील दि सासवड माळी एज्युकेशन सोसायटी यांच्या मॉडेल हायस्कूल सायकल बँक यांना रोटरी क्लब अकलूज तर्फे गरजू मुलींना २१ सायकलीचे लोकार्पण सोहळा माळीनगर येथे आज संपन्न झाला.
त्यावेळी दि सासवड माळी एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्त आबासाहेब जाधव, चंद्रकांत जगताप, व्हा.चेअरमन नितीन इनामके,सचिव अजय गिरमे,खजिनदार ज्योती लांडगे, संचालक अनिल रासकर, कल्पेश पांढरे, पृथ्वीराज भोंगळे, अकलूज रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष सीए नितीन कुदळे, उपाध्यक्ष नवनाथ नागणे, सचिव मनीष गायकवाड, प्रकल्प प्रमुख केतन बोरावके, अजिंक्य जाधव, ऍड प्रवीण कारंडे, दिपक फडे, अजित वीर, संदीप लोणकर, प्राचार्य कलाप्पा बिराजदार, उपप्राचार्य रितेश पांढरे, पर्यवेक्षक कल्याण कापरे, राजेश कांबळे, अमर राठोळ, आदी शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.
माळीनगर मधील मॉडेल हायस्कूल सायकल बँकची स्थापना संन २०२२ साली करण्यात आली आहे. त्यामधून जवळपास ४० सायकलीचे वाटप गरजू विद्यार्थ्यांना देण्यात आले आहे. त्यात रोटरी क्लब अकलूज तर्फे या बँकेला २१ सायकल देण्यात आली आहे. तसेच अकरावी व बारावी विद्यार्थ्यांना जेईई या परीक्षेसाठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना जवळपास दहा हजार रुपयाचा बुक सेट विद्यार्थ्यांना मोफत देण्यात आले आहेत.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील शिंदे यांनी केले तर कल्पेश पांढरे यांनी आभार मानले.