आज दुर्गाष्टमी निमित्ताने श्री कमला भवानीची नागवेलीच्या पानाने महापूजा!!
करमाळा प्रतिनिधी आलिम शेख मोबाईल नंबर 98 50 68 63 60
करमाळा तालुक्याचे ग्रामदैवत असलेल्या कमला भवानी मंदिरामध्ये आज दुर्गाष्टमीनिमित्त दर्शनासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आज नागवेलीच्या पानाला विशेष महत्त्व असते आज या पानाचा पानहार भवानी मातेला अर्पण करण्यात आला आजची महापूजा ओंकार पुजारी यांनी मांडली आज दुर्गाष्टमी ही तिथी असल्यामुळे कमला भवानी मातेला चंदन मळवट भरून त्यावर कुंकवाचा लेप देण्यात आला सुवर्ण अलंकार व त्रिशूल तलवार देऊन देवीची महापूजा मांडण्यात आली दुर्गाष्टमी निमित्ताने ओटी भरण्याची परंपरा आहे
ही ओटी भरण्यासाठी हजारो महिला भगिणी मंदिरामध्ये उपस्थित होत्या आज पंचायतन आरती समारोप असल्यामुळे भक्तगणांनी आरतीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती माही डेकोरेशन करमाळा यांनी मंदिराला झेंडूच्या फुलांनी गुंफून मंदिर सजावट केली आहे त्यामुळे मंदिराला आकर्षक स्वरूप प्राप्त झाले आहे ही सेवा विना मोबदला त्यांच्याकडून करण्यात येत आहे तसेच मराठा मंदिर डेकोरेशन यांनी होम कट्टा आकर्षक रित्या सजवला असून शुक्रवारी रात्री होम हवन संपन्न होणार आहे या होम हवनासाठी पूर्ण तयारी झाली आहे ही सेवा सुध्दा रेगुडे बंधूंनी विनामोबदला केली आहे.