श्रीनिवास वनगा यांच्या आमदार निधीतून पालघर बस स्थानकातील रस्त्याच्या कामाला तातडीने सुरुवात..

टाईम्स नाईन न्यूज नेटवर्क
उपसंपादक-विजय घरत भ्रमणध्वनी क्रमांक.7030516640.
पालघर शहर हे जिल्हा मुख्यालाचे ठिकाण आहे.येथे पालघर जिल्ह्यातील आणि परजिल्ह्यातील शेकडो प्रवासी रोज बसने प्रवास करत असतात.
राज्य परिवहन महामंडळाच्या पालघर येथील प्रमुख बस स्थानकात गेल्या अनेक महिन्यापासून मोठ-मोठे खड्डे पडल्याने बस वाहतूक करताना वाहतूकदारांना अडथळे निर्माण होत होते.
यामुळे अनेक ज्येष्ठ नागरिक आणि प्रवाश्यांना देखील बसचा प्रवास करताना मोठी अडचण येत होती. या समस्येचे गांभीर्य लक्षात घेऊन बसस्थानकाचे तत्कालीन मॅनेजर नितीन चव्हाण आणि विद्यमान मॅनेजर धनंजय शिंदे,आगर प्रमुख भरत वाघमोडे,वाहतूक नियंत्रक अजय संखे, नकुल पाटील व एस. टी.बँक चे संचालक हर्षल राऊत अधिकारी ,कर्मचारी यांनी आमदार श्रीनिवास वनगा यांची भेट घेऊन होणारी गैरसोय विद्यमान आमदार श्रीनिवास वनगा यांच्या निदर्शनात आणून दिल्यावर
आमदारांचे स्विय सहायक निलेश राऊत यांनी pwd अधिकाऱ्यांना सोबत घेऊन तातडीने अंमलबजावणी करण्याबाबत सूचना देऊन आमदार निधीतून तत्काळ 10 लक्ष रुपये मंजूर करून दिले.
व तत्काळ या कामास सुरुवात करण्याची आमदार श्रीनिवास वनगा यांनी सूचना केल्यावर प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात आली आहे .या बाबत परिवहन अधिकारी कर्मचारी आणि प्रवाश्यानी आमदार श्रीनिवास वनगा आणि या कामाबाबत सतत पाठपुरावा करणारे त्यांचे स्वीय सहायक निलेश राऊत यांचे विशेष आभार व्यक्त केले आहेत.



