बोईसर येथे धारदार कोयता घेऊन दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या तीन आरोपींना जेर बंद करून 19 लाख 60 हजार रुपये किमतींच्या 38 मोटरसायकल जप्त करण्यात पालघर स्थानिक गुन्हे शाखेला यश

पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत. भ्रमणध्वनी क्रमांक.7030516640. पालघर जिल्हा वृत्तांत
धारदार कोयता घेऊन बोईसर भागात दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या तीन दरोडेखोरांच्या मुसक्या आवळून त्यांच्या ताब्यातील 19 लाख 60 हजार रुपये किमतींच्या चोरीच्या मोटरसायकल जप्त करण्यात पालघर स्थानिक गुन्हे शाखा पोलीस उपनिरीक्षक सागर पाटील यांच्या पथकाला यश आले आहे.
पालघर जिल्ह्यातील काही पोलीस ठाण्यामध्ये मोटर सायकल चोरीचे गुन्हे दाखल आहेत.या गुन्ह्यांचे गांभीर्य लक्षात घेऊन पालघर जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील व अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज शिरसाठ यांनी या गुन्ह्यातील आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावे असे आदेश पालघर स्थानिक गुन्हे शाखा वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल विभुते यांना जारी केले होते.
वरिष्ठांचा या आदेशानुसार पोलीस निरीक्षक अनिल विभूते यांनी स्थानिक गुन्हे शाखा पालघर पोलीस उपनिरीक्षक सागर पंडित पाटील, पोलीस उपनिरीक्षक गणपत सुळे, पोलीस निरीक्षक स्वप्निल सावंत देसाई यांची वेगवेगळी पथके तयार करून तपास करण्याचे आदेश दिले होते. या पथकापैकी पोलीस उपनिरीक्षक सागर पंडित पाटील यांचे तपास पथक 20 फेब्रुवारी 2023 रोजी रात्री एक वाजण्याच्या सुमारास पेट्रोलिंग वॉच करत असताना बोईसर कॅमलिन नाकाते नवमी हॉटेल कडे जाणाऱ्या रोडवर तीन इसम बिगर नंबर प्लेटच्या दोन मोटर सायकल गाड्या घेऊन संशयितरित्या उभे होते.
या दोन इसमांची पोलीस उपनिरीक्षक सागर पाटील यांनी चौकशी केली असता ते पळून जायच्या मार्गावर असताना त्यांना अटक करून त्यांची अंग झडती घेतली असता त्यांच्याकडे धारदार कोयता, लोखंडी कटावणी, मिरची पूड, दोरी,कट्टर स्क्रू अशी हत्यारे मिळून आली यावरून (1)राम सखाराम काकड वय वर्ष (19) राहणार शहापूर जिल्हा ठाणे, (2)गुरुनाथ झुगरे वय वर्ष (20) राहणार बोटोशी बेलपाडा मोखाडा जिल्हा पालघर,(3)नितेश संजय मोकड वय वर्ष (22) राहणार वाघेची वाडी जव्हार या तिघांची अधिक चौकशी केली असता त्यांनी 19 लाख 60 हजार रुपयांच्या 38 मोटरसायकल चोरी केल्याची कबुली दिली आहे.



