डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे विवाहितेचा मृत्यू.पोलिसात डॉक्टरांच्या विरोधात तक्रार दाखल !!!तपासानंतर गुन्हा दाखल करू पोलीस निरीक्षकांची माहिती !!!
करमाळा प्रतिनिधी अलीम शेख
रावगाव येथील सौ शितल भाऊसाहेब करगळ वय 35
याची सिजरिंग करून प्रसूती झाल्यानंतर रक्तस्त्राव न थांबल्यामुळे दुर्दैवी मृत्यू झाला असून याप्रकरणी कुटुंबाच्या नातेवाईकांनी पोलिसात तक्रार दिली असून
पोस्टमार्टम चा रिपोर्ट आल्यानंतर याप्रकरणी गुन्हा दाखल करू अशी माहिती पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी दिली आहे
करमाळा येथील बिनवडे हॉस्पिटल मध्ये रायगाव येथील शितल करगळ तिला नऊ तारखेला प्रसुतीसाठी दाखल करण्यात आली होती नऊ तारखेला तिच्या पोटात प्रचंड कळा येत असल्यामुळे डॉक्टरांना सिजर करा अशी विनंती नातेवाईकांनी केली होती मात्र सिजर करायला डॉक्टरांनी सायंकाळी सहा वाजेपर्यंतउशीर केला
यामुळे ऑपरेशन नंतर रक्तस्त्राव थांबला नाही
नंतर तिला सात पिशव्या रक्त देण्यात आले तरीसुद्धा रक्तस्त्राव थांबला नाही नंतर डॉक्टर बिनवडे यांच्या सल्ल्यानंतर तिला नगर येथे हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले तेथे तिचा दुर्दैवी अंत झाला तिच्या पाठीमागे पती मुलगा व मुलगी असा परिवार आहे
याबाबत मुलीच्या वडिलांनी सांगितले माझ्या मुलीची डीएड झालेले होते ती हुशार होती आम्ही तिला ॲम्बुलन्स मधून नगरला नेत असताना तिन्ही घटना सांगितली डॉक्टरांनी पहिल्यांदा ऑपरेशन करून टाके घेतल्यानंतर पुन्हा काहीतरी चूक झाली म्हणून पुन्हा टाके काढून पुन्हा मला दुसऱ्यांदा टाके घेण्यात आले यावेळी मला प्रचंड त्रास झाला व रक्त थांबले नाही डॉक्टरांच्या चुकीचे ऑपरेशनमुळे माझ्या मुलीचा मृत्यू झाला म्हणून मुलीच्या वडिलांनी पोलिसात तक्रार दिली आहे
मुलीचे माहेर अंजनडव करमाळा तालुक्यातील असून मुलीचे सासर रायगाव हे करमाळा तालुक्यातच आहे
या दुर्दैवी घटनेमुळे या दोन्ही गावात प्रचंड शोककळा पसरली आहे
सोमवारी रात्री नऊ वाजल्यापासून ते मध्यरात्री दोन वाजेपर्यंत या तरुणीला प्रचंड वेदनावर रक्तस्त्राव होत होता मात्र या दरम्यान कोणत्याही उपचाराची तिला मदत मिळाली नाही डॉक्टर बिनवडे यांनी शिफारस केलेल्या अहमदनगर येथील रुग्णालयात बेड नाही म्हणून पेशंटला ऍडमिट करून घेण्यास हॉस्पिटलने नकार दिला या दरम्यान दीड तास वेळ वाया गेला. नंतर नातेवाईकांनी तिला नोबेल हॉस्पिटल अहमदनगर येथे दाखल केले
केवळ चुकीचा उपचार योग्य वेळेत हॉस्पिटलला दाखल करणे हॉस्पिटलमध्ये पोचल्यावर हॉस्पिटलने बेड न देणे अशा मानवी चुकामुळे या विवाहितेचा जीव गेला आहे मंगळवारी तिच्यावर रायगाव येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी प्रचंड मोठी गर्दी अंत्यविधी उपस्थित होती
स्वतः शेतकरी असलेली ही विवाहिता 20 ते 25 मजुरांना हाताशी घेऊन सर्व शेती स्वतः यशस्वीपणे करत होती अत्यंत कष्टाळू महिला म्हणून तिची या भागात ख्याती होती मात्र अचानक तिच्यावर काळ आणि गावाला घातल्यामुळे रायगाव परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.