पालघर जिल्ह्यातील पालघर लाचलुचपत प्रतिबंध विभाग पोलीस उपअधीक्षक पदी हर्षल चव्हाण यांची नियुक्ती
टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत भ्रमणध्वनी क्रमांक -7030516640
पालघर जिल्ह्यातील अँटी करप्शन विभाग पालघर उपअधीक्षक पदी हर्षल चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी मंगळवार दिनांक 27 ऑगस्ट 2024 पासून या पदाचा पदभार स्वीकारला आहे.याआधी या पदावर असलेले पोलीस उपअधीक्षक दयानंद गावडे यांची बदली पुणे अँटीकरप्शन विभागामध्ये झाली आहे.
पोलीस खात्यामध्ये भरीव कामगिरी व उत्कृष्टपणे आपले कर्तव्य बजावणारे पोलीस उपअधीक्षक हर्षल चव्हाण यांचा 2022 रोजी पोलीस महासंचालक यांच्या हस्ते सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला आहे.पोलीस उपअधीक्षक हर्षल चव्हाण 2014 ते 2019 रोजी (ATS) मुंबई येथे दहशतवादी विरोधी पथक तर 2019 ते 2022 रोजी (EOW) आर्थिक गुन्हे शाखा मुंबई आणि 2022 ते 26 ऑगस्ट 2024 रोजी पर्यंत मुंबई अँटीकरप्शन विभागामध्ये पोलीस उपअधीक्षक पदावर कार्यरत होते.
त्यांची बदली 26 ऑगस्ट 2024 रोजी पालघर जिल्हात पोलीस उपअधीक्षक अँटी करप्शन विभाग पालघर येथे झाली आहे. त्यांनी मंगळवार दिनांक 27 ऑगस्ट 2024 रोजी पालघर जिल्ह्यातील अँटी करप्शन विभाग पालघर पोलीस उपअधीक्षक पदाचा पदभार स्वीकारला आहे.
लाचलुचपत प्रतिबंध विभागातर्फे पालघर जिल्ह्यातील नागरिकांना आवाहान करण्यात येते की भ्रष्टाचारासंबंधी काही माहिती असल्यास किंवा लाच मागणाऱ्या शासकीय लोकसेवक किंवा निमशासकीय इसम यांच्या बद्दल काहीएक तक्रार असल्यास लाचलुचपत प्रतिबंध विभाग पालघर पोलीस उपअधीक्षक हर्षल चव्हाण यांच्याशी 982177 9921 या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.