महाराष्ट्र

लवंग येथील फिनिक्स इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये बकरीईद आणिआषाढी एकादशी निमित्ताने राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन

उपसंपादक ——–हुसेन मुलाणी टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क मो. 97 30 867 448

आषाढी एकादशी आणि बकरी ईद हे दोन्ही सण एकाच दिवशी आल्याने लवंग फिनिक्स इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन दिसून आले या दोन्ही सणांच्या अनुषंगाने स्कुल मध्ये बाल दिंडी आणि ईद मिलन एकत्र साजरा करून या शाळेने समाजापुढे राष्ट्रीय एकात्मतेचे उदाहरण देऊन आदर्श निर्माण केला आहे .

छोटे छोटे विद्यार्थी गळ्यात माळ हातात टाळ मस्तकी टिळा पांढरे धोतर शर्ट परिधान करून तर मुली साड्या नेसून डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन विठ्ठलाचे नामस्मरण करीत हे छोटे वारकारी आपल्या संस्कृतीची जपणूक करीत होते तर बकरी ईद या सणाला हे छोटे वारकरी मुस्लिम विद्यार्थ्यांना गळाभेट घेऊन ईद च्या शुभेच्या देत होते .या बाल दिंडीत इस्लामी पोशाखातील विद्यार्थी वारकऱ्यांसमवेत चालत असताना अल्लाहकडे वारकऱ्यांसाठी प्रार्थना करीत होते .

या सर्व वारकऱ्यांना दशरथ दगडे यांनी खाऊ वाटप केला रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना या दिंडीतील वेगळेपण पाहून राष्ट्रीय एकात्मता हिच आहे ,” हम सब एक है चाहे वेशभूषा अनेक है” .. असे उदगार उपस्थित नागरिकांकडून ऐकायला मिळत होते . या बाल दिंडीत पालक ही सहभागी झाले होते हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शाळेच्या संचालिका नूरजहाँ शेख मॕडम ,गुलशन शेख तसेच दशरथ दगडे,समाधान जगताप शाहीन कोरबू अस्ल्म् काझी, उघाडे मॕडम यांनी परिश्रम घेतले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button