शहर

पालघर जिल्ह्यातील सफाळे जलसार ग्रामपंचायतीवर ग्रामविकास पॅनलचा झेंडा.. सरपंच पदाच्या उमेदवार साक्षी गावड बहुमताने विजयी

टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत.भ्रमणध्वनी क्रमांक-7030516640.

पालघर जिल्ह्यातील सफाळे येथील जलसार ग्रामपंचायतीच्या 10 उमेदवारांची ग्रामपंचायत सदस्य निवडणूक रविवार दिनांक 5 नोव्हेंबर 2023 रोजी पार पडली या निवडणुकीचा निकाल सोमवार दिनांक 6 नोव्हेंबर 2023 रोजी घोषित करण्यात आला या निवडणुकीमध्ये ग्रामविकास पॅनलच्या महिला उमेदवार सौ. साक्षी गजानन गावड या बहुमताने विजयी झाल्या असून त्यांच्यासोबत ग्रामविकास पॅनलचे 8 सदस्य निवडणूक लढवून विजयी झाले आहेत. तर फक्त 1 बहुजन विकास आघाडी महिला उमेदवार सदस्य यांची बिनविरोध निवड करण्यात आली असून 10 पैकी 9 जागांवर ग्रामविकास पॅनलच्या उमेदवारानी निवडणूक लढवून जलसार ग्रामपंचायतीवर वर ग्रामविकास पॅनलचा झेंडा फडकवला आहे.

पालघर जिल्ह्यातील जलसार ग्रामपंचायतीची 10 उमेदवार सदस्यांची निवडणूक रविवार दिनांक 5 नोव्हेंबर रोजी पार पडली आहे. या निवडणुकीमध्ये सरपंच पदासाठी ग्रामविकास पॅनेलच्या सौ.साक्षी गावड, तर बहुजन विकास आघाडीच्या माधुरी भोईर, आणि अपक्ष उमेदवार स्वाती भोईर यांच्यामध्ये तिरंगी लढत झाली. यामध्ये ग्रामविकास पॅनलच्या महिला उमेदवार सौ.साक्षी गजानन गावड या 843 मते मिळवून विजयी झाल्या आहेत.तसेच त्यांच्यासोबत ग्राम विकास पॅनलचे विंकोश सुरेश म्हात्रे, प्रवीण भालचंद्र भोईर, सचिन पांडुरंग किणी, नितीन रामचंद्र भोईर, सौ कीर्ती किशोर धोदडे, सौ.पूजा सत्यम घरत, सौ.कमल संतोष गावड, आणि कुमारी अक्षता प्रकाश गावड हे 8 सदस्य विजयी झाले आहेत.
या आधी या ग्रामपंचायतीवर शिवसेनेची सत्ता होती.
गावाच्या सर्वांगीण विकास कामाच्या उद्देशाने जलसार गावातील ग्रामस्थांनी ग्राम विकास पॅनलच्या माध्यमातून ही निवडणूक लढवून एक हाती सत्ता प्रस्थापित केली आहे. असे ग्रामविकास पॅनलचे सल्लागार आणि मार्गदर्शक संजू घरत यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button