निरंजन डावखरेंचा घुमला विधानपरिषदेत बुलंद आवाज!
संपादक नौशाद मुलाणी टाईम्स 9 मराठी न्युज नेटवर्क
रत्नागिरी जिल्ह्यासह कोकणातील सर्वच स्तरांतील प्रश्न विधान परिषदेत मांडून ते धसास लावण्यासाठी विधीमंडळाच्या अधिवेशनात आमदार निरंजन डावखरे यांचा आवाज घुमला. मतदारसंघातील प्रश्न सोडविण्यासाठी विधीमंडळाच्या पटलावर केलेली भाषणे, मांडलेले मुद्दे महत्वाचे असतात. विधीमंडळाच्या आयुधांच्या माध्यमातून थेट संबंधित खात्याच्या मंत्र्याकडून उत्तर मिळत असल्यामुळे रखडलेल्या कामाला वेग येतो. तर स्थानिक पातळीवरील सरकारी विभागांकडून त्या प्रश्नाबाबत तत्परता दाखविली जाते. ते ध्यानात घेऊन भाजपाचे आमदार निरंजन डावखरे यांनी विधीमंडळाच्या प्रत्येक अधिवेशनात आवाज उठविला.
पदवीधरांना नोकरी, अंशकालीन ग्रंथपाल व प्रयोगशाळा सहायकांना कायम नोकरी मिळवून देण्याबरोबरच स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रश्न मांडले. रखडलेली नोकर भरती प्रक्रिया, शिक्षण सेवक पदाची भरती, एमपीएससीच्या माध्यमातून लिपिक दर्जासह सर्व परीक्षा घेण्याची मागणी आदी मागण्या सातत्याने केल्या. `एमपीएससी’चा कारभार वेगाने सुरू राहावा, यासाठी स्वतंत्र मुख्यालयाची मागणी मान्य करून घेतली. रत्नागिरी जिल्हा परिषदेतील खातेप्रमुखांची रिक्त पदे, पूरपरिस्थितीमुळे सीईटी अर्ज भरण्यासाठी कोकणातील विद्यार्थ्यांना मुदतवाढ आदींकडे लक्ष वेधले. तर कोरोना आपत्तीनंतर जिल्ह्यात बंद असलेले वॉटर स्पोर्ट्स सुरू करून पर्यटन व्यावसायिकांना दिलासा दिला.
विधान परिषदेत कोकणातील प्रश्न मांडण्यात निरंजन डावखरे यांचा बुलंद आवाज होता. त्यांच्या अभ्यासू वृत्तीमुळे त्यांना विधान परिषदेच्या तालिका सभापतीपदी ही दोन वेळा संधी मिळाली. त्यांनी आपल्या सहा वर्षांच्या दुसऱ्या टर्ममध्ये ६६ लक्षवेधी सूचना नियम १०१- अ अन्वये ५९ वेळा विशेष उल्लेख सूचना, ३३ औचित्याचे मुद्दे, ११ विषयांवर नियम ९३ अन्वये चर्चा, १९ वेळा निवेदने आणि २४ अशासकीय सूचना मांडल्या आहेत. कोकणच्या प्रगतीसाठी सातत्याने विधीमंडळात चर्चा करणारे आमदार म्हणून त्यांनी ओळख निर्माण केली.