महाराष्ट्र
आवाटी येथे उद्या उर्स कलंदर धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

करमाळा प्रतिनिधी अलीम शेख मोबाईल नंबर 98 50 68 63 60
आवाटी तालुका करमाळा येथे उद्या दिनांक 20 एप्रिल 2024 शनिवार रोजी हजरत वली चांद पाशा दर्गा मध्ये हजरत बु अलि शाह कलंदर पानीपत यांच्या स्मरणार्थ उर्स कलंदर चा धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले असल्याची माहिती दर्गा कमिटीने दिली आहे
उर्स कलंदर कार्यक्रमाच्या निमित्ताने उद्या आवाटी येथे वली बाबा दर्गाहांमध्ये विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे यामध्ये भाविकासाठी लंगर खाना तसेच मुए मुबारक चा कार्यक्रम होणार आहे सदर कार्यक्रमाच्या निमित्ताने येणाऱ्या भाविकांसाठी ट्रस्ट कमिटीने भाविकांची राहण्याची व्यवस्था केली असून सदर धार्मिक कार्यक्रमाचा लाभ भाविकांनी घ्यावा असे आवाहन दर्गाह ट्रस्ट कमिटीच्या वतीने तसेच आवाटी ग्रामस्थ यांच्यावतीने करण्यात आले आहे