सायन्सच्या दृष्टिकोनातून रोजा चे महत्व

टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क
शास्त्रीय दृष्टीकोनातून रोजे शरीरासाठी चांगल्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात. अधुनिक रोजा चिकित्सा विज्ञान चे जन्मदाता अमेरिकन विद्वान डॉ. ड्युई ने टाइफाइड च्या रोग्याला जबरदस्ती ने दूध पाजले असता त्याची उल्टी झाली. अनेक उपाय करून ही प्रयत्नात यश आले नाही. शेवटी डॉक्टरांनी रोजा प्रमाणे खाणे-पिणे बंद केले असता रोग्याची प्रकृती सुधारली. डॉ. एनीरिले हैत यांनी आपल्या फिजीकल कल्चर मध्ये लिहून ठेवल आहे की बरगडी फेफडे) चा टी.बी रोगी 20-२५ दिवस रोजे ठेवून तपासणी केली असता असे अढळून आले की टी.वी. चे बैक्टीरिया (जिवाणू) जास्त प्रमाणात नष्ट झाले..
शरीरातील रोजच्या रोज जास्त खाउन पाचक घटकांना जास्त मेहनत करावी लागते. रोजे चालू असता यांना शरीरातील आराम मिळतो त्यामुळे अल्सर सारखे आजार ही ठीक होउ शकतात. रोजामुळे सर्दी, टॉन्सिलाइटीज, दमा, एग्जीमा, मुळव्याध् डायबीटीज सारख्या अजारांना ही फायदा मिळतो. तंबाकू, सिगारेट,बिडी, दारु, शरीरासाठी घातक आहेत तंबाखू मध्ये निकोटीन नामक नशीला पदार्थ असतो तो मस्तीष्क आणि शरीरावर वाईट परिणाम करतो ज्याच्यामुळे फुफुसाचे आजार अल्सर, कॅन्सर सारख्या खतरनाक अजाराची जास्त शक्यता असते. रोजा मुळे या व्यवसनांवर नियंत्रण ठेवता येते व्यसन सोडवण्यासाठी रोजा फायदेशीर ठरतो. तसेच शरीरात साठलेली अतिरिक्त चरबी, विषारी द्रव्ये शरीराबाहे फेकली जातात. वजन कमी होते मनावर ताबा राहतो, सहनशीलता वाढते व अनेक आजारांना थोपवण्यास मदत होते.रोजे चालू असताना सुरुवातीला तिव्र गतीने वजन कमी होते त्यामुळे आपल्या शरीरातील जमलेली ‘गुलोकागौन’ चा ग्लुकोज मध्ये बदल होतो कारण शरीराला ताकत मिळावी या बरोबरच शरीरातील पाण्याची लेवल योग्य होते. व शरीरात साठलेले. विषारी द्रव्य शरीराबाहेर फेकली जातात व . शरीर निरोगी राहते. प्रत्येक वस्तूंची सफाई केली जाते. त्याच प्रमाणे शरीराची सफाई रोजा मुळे होते.
नूरजहाँन् फाकृद्दीन शेख [गणेशगाव] ता.माळशिरस जि. सोलापूर



