महाराष्ट्र

४३वी समुहनृत्यस्पर्धा_२०२३कलाकारांच्या कलेस प्रोत्साहन द्यावे- जयसिंह मोहिते-पाटील

अकलूज प्रतिनिधी राहुल गायकवाड

दिनांक- २४ प्रताप क्रीडा मंडळ, शंकरनगर- अकलूज च्या वतीने सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील यांच्या जयंती निमित्त सालाबादप्रमाणे यंदाही दिनांक २३ ते २५ डिसेंबर २०२३ या कालावधीत शालेय मुला-मुलींच्या समूह नृत्य स्पर्धेचे आयोजन स्मृतीभवन शंकरनगर या ठिकाणी करण्यात आले आहे.

यंदाचे स्पर्धेचे हे ४३ वे वर्ष असून यावर्षी श्रीमती रत्नप्रभादेवी मोहिते पाटील यांच्या जन्मशताब्दी निमित्त व मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जयसिंह मोहिते-पाटील व अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मदनसिंह मोहिते-पाटील यांच्या अमृत महोत्सवी वाटचाली निमित्त यावर्षी मंडळाच्या अध्यक्षा स्वरूपाराणी मोहिते-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नृत्य स्पर्धेचे भव्य आयोजन करण्यात आले आहे.

यावेळी मार्गदर्शन करताना संस्थापक अध्यक्ष जयसिंह मोहिते-पाटील यांनी कलाकारांच्या कलेचे कौतुक करून रसिकांनी त्यांच्या कलेस प्रोत्साहन द्यावे असे सांगितले. आज स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी अतिग्रामीण, ग्रामीण, खुला,शहरी या विभागातून गट क्र.२ (इयत्ता ५ वी ते ७ वी) मधील एकूण ३४ गीते तर गट क्र. ६ (खुला गट) मधील १४ गीते अशी दोन्ही गटातून एकूण आज ४८ गीते सादर झाली. यामध्ये एकूण ५६७ कलाकारांनी आपली कला सादर केली.

यावर्षी खास खुल्या गटातील स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून यामध्ये कर्नाटक, अलिबाग, कराड,पंढरपूर येथील स्पर्धक देखील सहभागी झाले आहेत.आजच्या स्पर्धेचा गटवार निकाल पुढील प्रमाणे गट २- (अतिग्रामीण) प्रथम-श्री.संत तुकाराम विद्यालय,बोंडले द्वितीय जि.प. केंद्रीय शाळा, पुरुंदावडे तृतीय विभागून-जि.प.प्राथ. शाळा, तरंगफळ, जि.प.प्राथ.शाळा, पिरळे ग्रामीण गट- प्रथम- (विभागून) श्री. बाणलिंग विद्यालय, फोंडशिरस, स.म.शंकरराव मोहिते पाटील विद्यालय, वेळापूर द्वितीय-विजयसिंह मोहिते-पाटील विद्यालय, विझोरी तृतीय-(विभागून) श्री. गणेश विद्यालय, पिंपळनेर, सदाशिवराव माने विद्यालय, माणकी (शहरी गट) -प्रथम- महर्षि शंकरराव मोहिते प्रशाला,यशवंतनगर द्वितीय- जिजामाता कन्या प्रशाला,अकलूज तृतीय – सदाशिवराव माने विद्यालय,अकलूज.

(खुला गट)प्रथम-(विभागून) डी टू डी क्वीन्स, कराड, डी डी एस ग्रुप, पंढरपूर द्वितीय-क्रेझी फोर
तृतीय-(विभागून) व्ही.के. स्टाईल ग्रुप, कर्नाटक, साई प्रेरणा कला मंच, अलिबाग या कार्यक्रमास नितीनराव खराडे-पाटील, दिपकराव खराडे-पाटील, शि.प्र.मंडळ अकलूज चे सहसचिव हर्षवर्धन खराडे-पाटील, संचालक सुभाष दळवी, संचालिका निशा गिरमे, जयंती समारंभ समितीचे उपाध्यक्ष लक्ष्मण आसबे, विविध शाळांचे सभापती, पत्रकार, मंडळाचे उपाध्यक्ष, सचिव, संचालक, स्पर्धा प्रमुख, सदस्य विविध शाळांचे शाखाप्रमुख, शिक्षक शिक्षकेत्तर, बहुसंख्य प्रेक्षक उपस्थित होते. सूत्रसंचालन दत्तात्रय मगर, देवानंद साळवे, इलाही बागवान यांनी केले. निकालाचे वाचन किरण सूर्यवंशी, राजकुमार पाटील, शकील मुलाणी यांनी केले. आज दुसऱ्या दिवसाच्या स्पर्धा अत्यंत उत्साहात पार पडल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button