मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून उद्या सकल मराठा समाजाच्या वतीने करमाळा बंदचे आयोजन

करमाळा प्रतिनिधी आलिम शेख
मराठा संघर्ष योद्धा तसेच मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून गेली कित्येक महिन्यापासून संघर्ष करीत असलेले मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून दिनांक 22 सप्टेंबर रविवार रोजी सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने जाहीर पाठिंबा म्हणून संपूर्ण करमाळा बंदचे आयोजन सकल मराठा समाज बांधवांने केले आहे

मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हे कित्येक दिवसापासून मराठा समाजाला आरक्षण मिळावे या प्रमुख मागणीसाठी उपोषणे करीत आहे सध्या जरांगे पाटील हे अंतर ओली सराटी या ठिकाणी मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी उपोषणाला बसलेले आहेत मात्र त्यांची प्रकृती कित्येक दिवस खालावत चालली असल्याने शासन त्याकडे दुर्लक्ष करीत आहे

शासनाचा निषेध म्हणून तसेच मराठा समाजाला आरक्षण मिळावे या प्रमुख मागणीसाठी सकल मराठा समाज बांधव उद्या करमाळा बंदचे आयोजन करणार आहे सदर बंद मध्ये सर्व समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून तसेच महाराष्ट्र शासनाला वेळेच जागे करण्यासाठी सदरच्या बंद मध्ये सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे



