महाराष्ट्र

पक्षप्रमुख व ठाकरे परिवारावर टीका करणाऱ्यांना जशास तसे उत्तर देऊ – अस्मिताताई गायकवाड

प्रतिनिधी… रियाज मुलाणी टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क मो 9921500780

सोलापूर जिल्हा महिला आघाडी च्या नेत्या अस्मिताताई गायकवाड यांची शिवसेना उपनेते पदी निवड झाल्या नंतर पहिल्यांदाच सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याला भेटी देत असताना शनिवारी दि. 2/12/2023 रोजी माळशिरस तालुक्यात अकलूज येथील विश्राम गृहात तालुक्यातील पदाधिकारी व शिवसैनिकांची बैठक पार पडली,

त्यावेळी सर्वांना संबोधीत करत असताना अस्मिता ताईंनी अनेक जुन्या गोष्टींना उजाळा दिला ,तसेच सोलापूर जिल्ह्याला हे उपनेते पद भाग्याने मिळाले असुन प्रत्येक शिवसैनिकांनी आपण स्वतः उपनेते आहोत असेच समजून काम करायचे असे संबोधित केले, आपल्या पक्षप्रमुखांवर आणि ठाकरे घराण्यातील कोणावरही कोणी टिका केली तर ते खपवून घेऊ नका त्याला जशास तसे उत्तर देण्याचे आवाहन त्यांनी शिवसैनिकांना केले,आपसातील मतभेद बाजूला ठेऊन पक्ष वाढीसाठी एकजुटीने काम करण्याचे आवाहन हि त्यांनी केले आहे,

आपल्या अत्यंत आक्रमक शैलीने त्यांनी शिवसैनिकांना मार्गदर्शन करुन आपण प्रत्येक शिवसैनिकांच्या पाठिशी बहिण म्हणून ठामपणे उभे आहोत याचा भरोसा दिला आहे,

यावेळी जिल्हा प्रमुख संभाजी राजे शिंदे व तालुकाप्रमुख संतोष भैय्या राऊत यांनी त्यांचा सत्कार केला व अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.महाराष्ट्र एसटी कामगार सेनेचे अविरतपणे काम करणारे एसटी कर्मचारी बाळासाहेब सुर्यवंशी हे सेवानिवृत्त झाल्यामुळे त्यांचा सत्कार अस्मिता ताई गायकवाड यांच्या कडून करण्यात आला, तसेच,अस्मिता ताई गायकवाड यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला,

सदर बैठकीस जिल्हा उपप्रमुख नामदेव वाघमारे,माजी तालुका प्रमुख अशोक घोंगडे,उप तालुकाप्रमुख अमोल उराडे, उप तालुकाप्रमुख डॉ.निलेश कांबळे,उप तालुकाप्रमुख रामकृष्ण जाधव,महादेव बंडगर, लक्ष्मण डोईफोडे, युवासेनेचे स्वप्नील वाघमारे, युवासेना महिला जिल्हा अधिकारी पुनम अभंगराव,अकलूज शहर प्रमुख अनिल बनपट्टे,नातेपुते शहरप्रमुख सनि गवळी, माळीनगर शहर प्रमुख अरूण मदने नातेपुते शहर प्रमुख सनी गवळी माळशिरस शहर प्रमुख अशोक देशमुख,सोशलमिडीयाप्रमुख अवधुत कुलकर्णी, युवा सेनेचे युवा अधिकारी दत्ताजी साळुंखे सागर साळुंखे,नातेपुते शहर संघटक निशांत इंगोले,खुडूस सतीश कुलाळ,विजय रुपनवर,विठ्ठल जाधव,गोरख गोरड,रज्जाक मुलाणी, अमर खंडागळे,शाखाप्रमुख दिपक दोरकर,शाखाप्रमुख गणेश काळे, मळोली गावचे शाखाप्रमुख दात्ताजी काशीद वेळापूरचे शाखाप्रमुख रामा शेंडगे बाळू ननावरे आदि मान्यवर उपस्थित होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button