जरांगे पाटलांचे उपोषण सोडण्यातगेलेल्या शिष्ट मंडळातकरमाळ्याच्या मंगेश चिवटे यांचा समावेश

करमाळा प्रतिनिधी आलीम शेख
सरसकट मराठा समाजाला आरक्षण द्या या मागणीसाठी गेली नऊ दिवसापासून उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सोडण्यासाठी सरकारच्या वतीने जी समिती पाठवण्यात आली होती त्या समितीत करमाळ्याचे मंगेश चिवटे यांचा समावेश करण्यात आला होता
दोन दिवसांपूर्वी चर्चा करण्यासाठी संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगेश चिवटे यांना अंतरवाली सराटी येथे पाठवले होते
दौऱ्यात त्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या तब्येतीची चौकशी करून
त्यांना पाणी घ्या व औषध उपचार घ्या अशी विनंती मुख्यमंत्र्यांच्या वतीने केली होती
आज सकाळी मुंबई येथून चार मंत्री दोन आमदार दोन निवृत्त न्यायाधीश यांच्या समवेत मंडळात मंगेश चिवटे यांचा शिष्टमंडळात समावेश करून त्यांना पाठवले होते
सायंकाळी पाच वाजता आमदार बच्चू कडू मुख्यमंत्री कार्यालयाचे ओएसडी मंगेश चिवटे
पण निवृत्त न्यायाधीशांनी जवळपास एक तास जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करून त्यांच्या मागण्या समजून घेतल्या व मुख्यमंत्र्यांनी दिलेले प्राथमिक संदेश त्यांच्यापर्यंत पोहोचले
यानंतर साडेसहाच्या सुमारास
मंत्री धनंजय मुंडे
मंत्री अतुल सावे उद्योग मंत्री उदय सामंत
मंत्री संदिपान भुमरे पाटील यांच्याशी चर्चा केली
जरांगे पाटील यांच्या मागण्या लिहून घेऊन त्या तात्काळ मुख्यमंत्री कार्यालयापर्यंत व मुख्यमंत्र्यांपर्यंत पाठवण्याची जबाबदारी त्यांनी पार पाडली
मंगेश हे मूळचे करमाळ्याचे असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विश्व सहकारी म्हणून त्यांनी ओळख निर्माण केली आहे



