महाराष्ट्र

पावसाळ्यात वातावरणात आद्रतेचे प्रमाण अधिक असल्याने गुरांच्या आरोग्यावर त्याचा विपरीत परिणाम होतो – कृषीदूत

विशेष प्रतिनिधी.. रियाज मुलाणी टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क मो 9921500780

माळीनगर : पावसाळ्यात वातावरणात आद्रतेचे प्रमाण अधिक असले आणि त्यामुळे वेगवेगळ्या बुरशी, जिवाणू, विषाणू यांचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात होतो व त्याचा वि वीपरीत परिणाम गुरांच्या आरोग्यावर मोठ्या प्रमाणावर होतो असे मत कृषीदुत भाग्यश्री कदम, आकांक्षा मोरे, लक्ष्मी कोरे, श्वेता भडांगे, रोहिणी गोलेकर, मेघना मोरे, अंकिता भोगावडे, प्रणाली देशमुख, प्रशाली पवार यांनी महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी संलग्नित, रत्नाई कृषी महाविद्यालय, अकलूज आयोजित ग्रामीण जागरूकता कार्यानुभव अंतर्गत व्यक्त केले.

पावसाचे पाणी गोठ्यातील शेण, मुलमुत्र यामध्ये मिसळून गोठ्यात दुर्गंधी पसरते आणि जनावरे वेगवेगळ्या आजाराला बळी पडतात आणि त्याचा थेट परिणाम जनावराच्या दूध उत्पदनावर होतो आणि शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागते. असे होऊ नये म्हणून गुरांच्या गोठ्याची स्वच्छता ही अत्यावश्यक असते.

गोठ्याची स्वच्छता कश्या प्रकारे व वेळोवेळी केली पाहिजे तसेच निर्जंतुकीकरण करणे ही आवश्यक आहे असे मार्गदर्शन शेतकऱ्यांना केले त्याकरिता त्यांना विषय शिक्षक प्रा. डी. एस. मेटकरी तसेच त्याकरिता अकलूज येथील शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष जयसिंह मोहिते पाटील, रत्नाई कृषी महावद्यालयाचे प्राचार्य आर.जी. नलवडे, समन्वयक प्रा. एस. एम. एकतपुरे, प्रा. एम. एम. चंदनकर  आणि प्रा. एच. व्ही. कल्याणी यांचे मार्गदर्शन लाभले त्यावेळी माळीनगर गावातील शेतकरी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button