महाराष्ट्र

सत्तेच्या राजकारणातून प्रस्थापित व घराणे शाहीला खरोखर हद्दपार करता येईल काय,,,,,?

ऍड अविनाश टी काले , अकलूज
मो न :- 9960178213

निवडणुका घोषित झाल्या की , प्रस्थापित हटाव व घराणे शाही हटाव च्या घोषणांना उत येतो .अगदीच सामाजिक चळवळीत व राजकारणात नवखी असलेली तरुण पिढी याने अती उत्साही बनते याचे कारण क्रांती आणि बदलाची उर्मी असलेले तारुण्य यातून सहज सुलभ प्रेरणेतून स्त्रवणारी बंडखोर वृत्ती शमवण्याची शक्ती या घोषणेे त असते .भारतीय धार्मिक रचना आणि जातीय सामाजिक उतरंडीची रचना ज्ञात नसलेल्या आंबेडकर वादी चळवळी आणि पक्ष यात काम करणाऱ्या अनेक तरुणांना या भीषण वास्तवाची जाणच नसते .समग्र नवबौध्द समाज एकिकृतं झाला , आणि तो आर पी आय किंवा वंचित सारख्या पक्षाच्या झेंड्या खाली एकमुठीने उभारला की आपण संसदीय राजकारणात ही अनेक जागा अगदी लोकसभेच्या ही सहज निवडून आणू अशी त्यांची भावना असते .

या बाबतीत त्यांना फारसा दोष देता येत नाही , त्याचे कारण लोकशाही बद्दल व त्याच्या व्याख्येबद्दल त्याने जे वाचले आणि ऐकले त्यातून त्याचा हा समज दृढ होणे साहजिक आहे .पण या निवडणूक प्रक्रियेतून जे लोक व नेते गेले आहेत त्यांना यातील वास्तव आणि गंभीरता लक्षात आलेली आहे .भारतातील लोक हे लोकशाही पद्धतीने आकाराला आलेलेच नाहीत , ते एक तर धर्माचे सदस्य आहेत आणि त्या धर्मात जाती असतील तर त्या त्या जातीचे ही सदस्य आहेत , आपापल्या धर्म समुहाप्रती प्रेम , आणि कट्टरता याने ते व्यापलेले आहेत आणि त्या धर्मातील सामाजिक मान्यतेचे साखळ दंड यांनी ते जखडून टाकलेले आहेत .या मान्यता तोडण्याची त्यांची प्रज्ञा नाही आणि ती हिंमत ही त्यांच्यात नाही ,
जात ही फक्त मानसिक स्तरावर अस्तित्व ठेऊन नाही तर ती मानवी समुदायाच्या व्यवहारावर ही अंकुश ठेऊन आहे भटक्या विमुक्त जातीतील अगदी छोट्या जातीत जेंव्हा जात पंचायत निर्णय घेते व एखाद्या व्यक्तीस किंवा कुटुंबास ती वाळीत किंवा जाती बहिष्कृत करते तेंव्हा त्या व्यक्तीचे. व कुटुंबाचे सर्वस्व हिरावून घेतल्याची जाणीव त्यास होते ,

याचे कारण त्या कुटुंबातील सदस्यांना कोठे ही सामावून घेतले जात नाही , त्यांच्या मुला मुलींची विवाह होत नाहीत , की त्यांच्या अंतविधी कार्यक्रमात ही समाज सामील होत नाही , ही सर्वात भयानक शिक्षा जात व्यवस्थेने त्यांना दिलेली असते .व्यक्तीचा सामाजिक दर्जा ही हीच जात व्यवस्था निहित करते ,डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी त्याचे वर्णन केलेले आहे , खालच्या जातीचा कितीही अभ्यासू , कितीही सदाचारी असला तरी जात व्यवस्था आणि वर्ण व्यवस्था त्याला वरच्या वर्णात ढकलत नाही , इथे वर्ण आणि जात जन्माने मिळते आणि ती मरणा नंतर ही शिल्लक राहते .मार्क्स वादात जशी वर्ग विहीन समाज रचनेची सुंदर कल्पना अस्तित्वात आहे , पण ते ही कल्पना विश्व च आहे , जगात कोणी गरीब नसेल , कोणी श्रीमंत नसेल , कोणी कामगार नसेल आणि कोणी त्यांचा मालक नसेल सगळे नागरिक म्हणून समान असतील व प्रत्येकाला काम व त्या कामाचा दाम मिळेल , सर्व प्रकारच्या शोषणाचा अंत झालेला असेल , सगळी जमीन , जंगल , खनिज , पाणी , राष्ट्राच्या मालकीचे म्हणजेच समाजाच्या मालकीचे असेल .

वर्ग विहीन राज्य ही नंतर राज्य या कल्पने पासून ही दूर जाईल आणि स्टेट लेस व्यवस्था निर्माण होईल .
अशीच परिकल्पना जात व्यवस्थेच्या अंगाने निर्माण झाली आणि कास्ट लेस समाज हे सुंदर स्वप्न पाहणाऱ्यां चळवळी चां जन्म झाला .अस्पृश्यता विरोधी चळवळीचा भाग म्हणून किंवा त्या लढाईचा भाग म्हणून निर्माण केलेली धर्म व्यवस्थेची चिकित्सा , आणि यातील सांस्कृतिक संघर्ष यावर उभारण्यात आलेली चळवळ , स्वातंत्र्य प्राप्ती नंतर ही संसदीय राजकारणात चळवळ म्हणून आंबेडकर वादी समाजाने जोपासली आणि या निमित्ताने नव्या आलेल्या पिढी ने ही डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धम्म अंगिकारून तत्कालीन हिंदू धर्माला व जाती व्यवस्थेला सोडचिठ्ठी देऊन ही त्याचा अंगीकार म्हणावा तसा न करता पुन्हा पुन्हा ते हिंदू धर्माच्या चिकित्सा मांडत राहिले , त्यातील त्यांच्या मान्यता असलेल्या देव नावाच्या संकल्पनेवर ते प्रहार करत राहिले .

असेच प्रहार प्रबोधन कार ठाकरे यांनी ही केले , पण पुढे त्यांच्याच वारसांनी हिंदुहृदसम्राट बनण्या साठी याच आंबेडकरी चिकित्सक चळवळीच्या नेत्यांच्या वक्तव्याचा आधार घेऊन “ते आपल्या देवी देवतांची टिंगल टवाळी करतात , त्यांचे प्रति अभद्र टिपन्नी करतात , तरी आम्ही षंढ बनून हे का सहन करत आहोत असा प्रश्न निर्माण केला आणि त्या आधारे निर्माण झालेल्या शिवसेनेचा संघर्ष दलीत पँथर शी अनेकदा झाला .याचे प्रतिबिंब राजकीय क्षेत्रात ही पाझरले आणि नवबौध्द समाज हा बहुसंख्य हिंदू धर्मियांच्या पासून अलग पाडला गेला , त्या मुळे संसदीय राजकारणात ही तो बहिष्कृत सदरात ढकलला गेला .अनु जाती तील अधिकचा टक्का असलेला नवबौध्द समाज संसदीय लोकप्रतिनिधी बनण्यासाठी ज्या उमेदवारी प्रस्थापित पक्षांनी दिल्या पाहिजेत त्या देताना त्या पक्षावर नियंत्रण असणारे जे उच्च वर्णीय समूह आहेत त्यांना ही या लोक भावने चे उल्लंघन करता येत नाही हे वास्तव आहे .

अश्या सामाजिक दृष्ट्या बहिष्कृत असलेल्या जात व्यवस्थेतून एखादे नेतृत्व उभारले तरी ही त्यास त्या पातळीवरील स्विकारहार्यता राहत नाही .हे आपण ऍड प्रकाश जी आंबेडकर साहेब यांच्या थेट उमेदवारी तून अनुभवले आहे हे झाले मागास वर्गीय अहिंदू समाजाचे चित्र , जे हिंदू दलीत आहेत आ राम सातपुते यांच्या भाषेत (सनातनी हिंदू दलीत) असा नेता नव्याने प्रस्थापित बनवला जाऊ शकतो , जसे काँग्रेस ने सुशील कुमार जी शिंदे साहेब यांना नेते बनवले .पण आपला विषय तो नाहीच आहे ,अगदी नवखा आणि अतिशय गरीब असलेला उमेदवार प्रस्थापित नेतृत्वाला किंवा घराणे शाहिला पर्याय देऊ शकतो का? याचे उत्तर आहे होय आणि नाही ही ,

अपवादात्मक रित्या उच्च वर्णीय जातीय हितसंबंधांची लढाई लढून त्याच जाती समूहातील गरीब व्यक्ती ही लोकशक्ती आणि जनधारा चे आधारे नेता बनून प्रस्थापितांना हरवून नेता बनू शकते पण ही बाब अपवादात्मक आहे (मनोज जरांगे पाटील)संसदीय राजकारणात आत्ता निवडणुका इतक्या महाग झाल्या आहेत की त्यांनी कधीच कोट्यवधी ची उड्डाणे घेतली आहेत , आणि ज्यांच्या खिशात दमडी नाही असा माणूस निवडणुकी साठी लागणारी यंत्रणा , प्रचंड मनुष्यबळ कसे उभे करणार?हा प्रश्नच आहे भारतीय जनता नेत्याच्या प्रेमात असते , ती व्यक्ती पूजक ही असते , आणि असा समाज हा वारसा पूजक ही असतो , तो समाज च त्या त्या प्रस्थापित नेत्यांच्या घरातील सदस्यांना आपला भविष्यकालीन नेता मानतो आणि त्याच्या विकासासाठी तो आवश्यक ते पाठबळ आणि योगदान ही बहाल करतो .
प्रस्थापित राजकीय घराण्याला तोडणे ही आदर्श वादी कल्पना असली तरी ही स्थानिक स्वराज्य संस्था , शिक्षण संस्था आणि आर्थिक व्यवहारांवर त्यांची असलेली सत्ता , मोडीत काढणे हे भाषण करण्या इतके सोपे नाही
प्रस्थापित व्यवस्थेत प्रस्थापित घराण्याचे हित सबंध एकमेकात गुंफलेले असतात, आणि अश्या लोकांची एक समांतर शक्ती समाजव्यवस्थेवर आरूढ झालेली असते ,
तिला ब्रेक करणे एखाद्या व्यक्तीच्या कुवती बाहेर असते पण सुसंघटित प्रयास आणि प्रस्थापित व्यवस्थेला छेद देणारी पर्यायी व्यवस्था तितकीच मजबूत असावी लागते , तरच हे घडू शकते ,

त्या साठी ही ती चळवळ प्रस्थापित उच्च वर्गीयातून निर्माण झाल्यास यश तत्काळ मिळते आणि ती खालच्या वर्गातून आलेली असेल तर मान्यवर कांशीराम जी यांनी निर्माण केलेल्या आंदोलना सारखी प्रभावी असावी लागते , हे मिशन आहे असे समजून मिशनरी वृत्तीने समर्पित कार्यकर्त्यांची फळी अहोरात्र समाज व्यवस्था बदला साठी प्रयत्नशील राहिली पाहिजे निवडणुकीत फक्त सर्व जाती धर्मातील , व सामान्य कुटुंबातील लोकांना उमेदवारी दिल्याने प्रस्थापित हटवता येत नाहीत ,
शेकडो अपंग सदृढ पायाच्या घोड्याला शर्यतीत हरवू शकत नाहीत हे एकच उदाहरण पुरेसे आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button