महाराष्ट्र

नवीन शैक्षणिक धोरणात प्रात्यक्षिक व अनुभवावर आधारित अध्ययन व अध्यापन यावर भर दिला आहे —-प्रा. आबासाहेब देशमुख

कार्यकारी —-उपसंपादक हुसेन—– मुलाणी टाइम्स 9 मराठी न्युज नेटवर्क मो.—– 97 30 867 448

नवीन शैक्षणिक धोरण व  प्राचार्या समोरील आव्हाने या विषयावर कवयित्री बहिणाबाई चौधरी नॉर्थ महाराष्ट्र विद्यापीठ प्राचार्य फोरम जळगाव यांचे वतीने धनाजी नाना महाविद्यालय, फैजपूर जिल्हा जळगाव येथे  आयोजित प्राचार्य परिषदेत महाराष्ट्र राज्य प्राचार्य महासंघाचे अध्यक्ष डॉ. आबासाहेब देशमुख यांनी व्याख्यान दिले. त्यावेळी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर व्ही. एल. माहेश्वरी, एम. जे .महाविद्यालय जळगावचे माजी प्राचार्य डॉ. अनिल राव तसेच शिक्षण सहसंचालक डॉ. संतोष चव्हाण , धनाजी नाना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.पी. आर. चौधरी हे उपस्थित होते.

डॉ. आबासाहेब देशमुख यांनी आपल्या भाषणातून नवीन शैक्षणिक धोरणाची संकल्पना, ध्येय व उद्दिष्टे स्पष्ट केली .नवीन शैक्षणिक धोरणात कला, वाणिज्य व विज्ञान शाखेच्या पदवीचा कालावधी तीन वर्षावरून चार वर्षे करण्यात आलेला आहे. तसेच विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीनुसार व गरजेनुसार विषय निवडून शिक्षण घेता येणार आहे. नवीन शैक्षणिक धोरणातील मल्टी डिसिप्लिनरी ऍप्रोच मुळे कला शाखेचा विद्यार्थी वाणिज्य किंवा विज्ञान तसेच वाणिज्य शाखेचे विद्यार्थी कला किंवा विज्ञान आणि विज्ञान शाखेचा विद्यार्थी कला किंवा वाणिज्य या शाखेकडील त्याच्या आवडीचे विषय निवड करून ते शिकण्याचे मुभा विद्यार्थ्यांना देण्यात आली आहे.

विद्यार्थ्यांना तंत्रज्ञान कुशल बनवणे, त्याच्यात रोजगारक्षम कौशल्य विकसन करणे, त्याला नीती मूल्याचे शिक्षण देणे, विद्यार्थ्यांमध्ये संशोधक वृत्ती वाढवणे तसेच त्याच्या शैक्षणिक गुणवत्तेचा दर्जा वाढवणे यावर नवीन शैक्षणिक धोरणात भर दिला आहे .नवीन शैक्षणिक धोरणात प्रात्यक्षिक व अनुभवावर आधारित अध्ययन व अध्यापन या गोष्टीवर विशेष भर दिला आहे .त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास व कौशल्य गुण वाढण्यास मदत होणार आहे. नवीन शैक्षणिक धोरणातील बहुभाषिकता संकल्पनेमुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या मातृभाषे बरोबरच परकीय भाषेचे शिक्षणाची सोय करण्यात आली आहे

त्यामुळे विद्यार्थ्याला त्याची मातृभाषा (मराठी ,तमिळ ,कन्नड, मल्याळम इत्यादी) बरोबरच हिंदी व इंग्रजी याव्यतिरिक्त फ्रेंच, जर्मन, रशियन ,जापनीज यासारख्या अन्य परकीय भाषा ही गरजेनुसार शिकण्याची सोय केली आहे .त्यामुळे अशा विद्यार्थ्यांना परदेशात जाऊन शिक्षण घेणे व नोकऱ्या मिळवणे अधिक सोयीचे होणार आहे. थोडक्यात विद्यार्थ्यांना बहुभाषिक बनवण्याची सोय या शिक्षण पद्धतीमध्ये केली आहे. नवीन शैक्षणिक धोरण अधिक लवचिक असून विद्यार्थी केंद्रित करण्यात आले आहे .चार वर्षाचा पदवी अभ्यासक्रम पूर्ण करताना प्रथम वर्ष पूर्ण केल्यानंतर पदवी सर्टिफिकेट, दोन वर्षे पूर्ण केल्यानंतर डिप्लोमा ,तीन वर्षे पूर्ण केल्यानंतर पदवी व चार वर्षे पूर्ण केल्यानंतर ऑनर्स पदवी विद्यार्थ्यांना मिळणार आहे. चार वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण करताना विद्यार्थ्यांना मल्टिपल एन्ट्री व मल्टिपल एक्झिटची सोय केली आहे .

एखाद्या महाविद्यालयात नसलेला विषय तो अन्य महाविद्यालयात जाऊन शिकू शकतो अशी ही सोय करण्यात आली आहे. नवीन शैक्षणिक धोरणात विद्यार्थ्यांना त्यांची क्षमता असेल तर एका वेळेस दोन पदव्या घेता येतील उदाहरणार्थ बी.एससी. करणारा विद्यार्थी त्याच कालावधीत बी.ए. किंवा बी.कॉम. ही पूर्ण करू शकतो.पदव्युत्तर अभ्यासक्रम (एम. ए., एम.एससी. , एम .कॉम .)एक किंवा दोन वर्षाचा राहील. बी.एड. अभ्यासक्रम आता दोन वर्ष ऐवजी चार वर्षाचा करण्यात आला आहे .एम .फिल. ही पदवी नवीन शैक्षणिक धोरणात बंद करण्यात आली आहे. पदवीच्या चौथ्या वर्षात संशोधनावर आधारित अभ्यासक्रम राहणार असल्यामुळे अशा विद्यार्थ्यांना संशोधनाकडे आकर्षित करणे व संशोधनाचा दर्जा वाढवणे हा उद्देश ठेवण्यात आला आहे.

शिक्षण घेताना विद्यार्थ्यांना बँका, सहकारी संस्था ,कारखाने, उद्योगधंदे इत्यादी ठिकाणी जाऊन विद्यार्थ्यांच्या गरजा व आवश्यकतेनुसार प्रशिक्षण (ऑन द जॉब ट्रेनिंग) घेण्याची सोय नवीन शिक्षणाधोरणात शैक्षणिक धोरणात करण्यात आलेली आहे . पदवी अभ्यासक्रमात कौशल्य विकास अभ्यासक्रमाचा समावेश केला असल्यामुळे पदवी घेऊन बाहेर पडलेल्या विद्यार्थी अधिक सक्षम होईल अशी अपेक्षा आहे असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. आबासाहेब देशमुख यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button