मराठा व कुणबी एकच असल्याचे अनेक पुरावे असल्याने सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय त्वरित घ्यावा : नितीन झिंजाडे

करमाळा प्रतिनिधी अलीम शेख मोबाईल नंबर 98 50 68 63 60
मराठा व कुणबी एकच असल्याचे अनेक पुरावे असल्याने सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय त्वरित घ्यावा अशी मागणी भाजपाचे नितीन झिंजाडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.याबाबत मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की,आपला देश व राज्य कायद्यानुसार चालते.कायाद्यामध्ये पुराव्याला अनन्य साधारण महत्व आहे.सध्या राज्यात मराठा आरक्षणाच्या मागणीने जोर धरला आहे.
समाजाची हीं मागणी वस्तूथितीला धरून व पुराव्यावर आधारित आहे त्यामुळे आपल्या सरकारने कुणबी बाबत पुरावा-पुरावा करून भुई धोपटू नये,एक नाही तर तब्बल १० हजारपेक्षा जास्त पुरावे सांगत आहेत की मराठा हेच कुणबी आहेत.हेही कमी असेल तर पश्चिम महाराष्ट्रातील गावा गावातील राजकीय लोकांकडे सध्या कुणबी प्रमाणपत्र आहेत.

मग त्यांच्या बाकीच्या गरजवंत गरीब भाऊबंद मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यायला हरकत काय ? असा सवलाही त्यांनी सरकारला केला आहे.त्यामुळे सरकारने आता जास्त वेळकाढू पणा करू नये.मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्रे देण्याचा निर्णय त्वरित घ्यावा.सरकारची ही तर जबाबदारी आहेच,असं असलं तरी मराठा आंदोलकांना सर्वपक्षीय नेत्यांनी ४० दिवसांची मुदत दिली होती.
विरोधी पक्षानीसुद्धा मराठा समाजाच्या या जिव्हाळ्याच्या प्रश्नाकडे गंभीर्याने पाहिलं पाहिजे.रोम जळत असताना निरो राजा जसा बासुरी वाजवत होता तस विरोधक या प्रश्नाकडं पाहत आहेत.सर्व राजकीय पक्षानी राजकारण बाजूला ठेऊन मराठा आरक्षण संदर्भात विशेष अधिवेशन बोलवण्यासाठी पुढ आलं पाहिजेत व मराठा समाजाला कुणबी आरक्षण जाहिर करून तसा निर्णय त्वरित घेतला पाहिजे.पण सर्वपक्षीय राजकारणी असं करणार नाहीत कारण या सर्वांचं हित हे हा आरक्षण प्रश्न सोडवण्यापेक्षा चिघळवण्यात जास्त दिसतय म्हणूनच असा पुढाकार घेताना कुणी दिसत नाही असा आरोपही त्यांनी त्यांनी सत्ताधारी व विरोधकांवर लागवला आहे.
सत्तेच्या पोळीसाठी वातावरण चिघळवण्याचे पाप राज्यातील सत्ताधारी व विरोधक सध्या करत आहेत हे स्पष्ट झाले आहे.आताच्या या सतत्ताधाऱ्यासोबत विरोधकानाही मराठा समाज सोडणार नाही हे ध्यानात घेण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.या निवेदनाच्या प्रति उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार,विरोधी पक्षनेते अंबादासजी दानवे,काँग्रेसचे आ.नाना पाटोले यांना पाठवल्या आहेत.



