इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी रोजगार हमी योजनेतून बांबूची लागवड करावी. गटविकास अधिकारी विजयकुमार परीट.

इंदापूर प्रतिनिधी एस. बी. तांबोळी,
मोबाईल – 8378081147
महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी बांबूची लागवड करावी. पिकांची फेरपालट, माती परीक्षण व ठिबक सिंचन पद्धत वापरून जमिनीचे आरोग्य सांभाळण्याचे आवाहन गटविकास अधिकारी विजयकुमार परीट यांनी केले.

इंदापूर पंचायत समितीच्या“लोकनेते शंकरराव पाटील सभागृहात ” इंदापूर पंचायत समिती, कृषी विभाग यांचे वतीने आयोजित कै. वसंतराव नाईक यांची जयंती कृषी दीन म्हणून साजरी करण्यात आली. यावेळी तालूका कृषी अधिकारी भाऊसाहेब रूपनर, संजय जगताप, विस्तार अधिकारी युनूस शेख, अजित घोगरे, सतीश महानवर, अशोक फलफले तसेच ग्रामसेवक, कृषी पर्यवेक्षक, कृषी सहाय्यक, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विजयकुमार परीट पुढे म्हणाले की, इंदापूर पंचायत समिती मार्फत राबवण्यात येत असलेल्या विविध शासकीय योजनांचा फायदा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवा ण्याचे आवाहन शेवटी त्यांनी केले.
विस्तार अधिकारी युनूस शेख यांनी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या योजनांची माहिती दिली. त्यामध्ये डीबीटी योजना, सेंद्रिय शेती प्रोत्साहन योजना, राष्ट्रीय बायोगॅस, डॉ बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनांची माहिती दिली.

कृषी दिनाचे औचित्य साधून मका पीक स्पर्धेत उच्चांकी उत्पादन घेणारे शेतकरी व कृषि क्षेत्रात नावीन्यपूर्ण उपक्रम राबविलेल्या महिला शेतकऱ्यांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
तालुका कृषी अधिकारी भाऊसाहेब रुपनवर यांनी कृषी विभागामार्फत राबिण्यात येत असलेली प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सूर्यवंशी यांनी केले.