महाराष्ट्र

धर्माच्या नावाने बुवाबाजी मठ आश्रम थाटणाऱ्यांना शेकडो एकर जमिनी दान केल्या जातातपण स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर वर्ष्यानंतरही मागास भटके उपेक्षिता्नां रहायला एक गुंठा जमीनही मिळू नये हे कोणाचे अपयश

बी टी शिवशरण


स्वतंत्र भारत देशात रहाण्यासाठी एखाद्या गरीब उपेक्षित मागास घटकांनी शासकीय जागेवर अतिक्रमण करुन झोपड्या घरे उभी करुन रहायला गेले तर सरकारी यंत्रणा मोठा लवजमा घेऊन ती घरे पाडून त्यांचा संसार मोडून टाकतात ही अवस्था एका बाजूला तर दुसरी बाजू अशी कीं धर्म मंदिर यांच्या नावाने तसेच धर्माचा ठेका घेतलेल्या बुवाबाजी करणारे धर्ममार्तंड यांच्या आश्रमांना मंदिराना शेकडो एकर जमिनी दान केल्या जातात त्यातून ठराविक पुरोहित बुवाबाजी करणार्यांचा तीन पिढ्याचा उदरनिर्वाह प्रश्न सुटू शकतो

आजही काही समाजातील घटकांना पोटासाठी चोरी करावी लागते ज्या देशात पोटासाठी चोरी करावी लागावी रहायला घर उभी करण्यासाठी अतिक्रमण करावे लागते गोरगरिबांना झोपडपटीत स्वच्छ पाणी रस्ते दिवाबत्ती पक्की घरे यासाठी वाट पहावी लागते हा विरोधभास नाही का आजपर्यंत सर्वच राजकीय पक्षानी मागासवर्गीय लोकांना विकासाची आश्वासणे भुलथापा देऊन सत्ता हशील केली पण मागासवर्गीय उपेक्षित वंचीत घटकांना न्याय जगण्याच्या मूलभूत सुविधा मिळत नाहीत मात्र गल्ली ते दिल्ली निवडणुका आल्या कीं तेच नेहमीचेच आश्वासन पैसे वाटप

खोटी आश्वासन हे ठरलेलं शिक्षण रोजगार बदलत्या तंत्रज्ञान आधुनिक उपाय असणारे शिक्षण सुविधा याला शासन प्राधान्य का देत नाही आज मंदिर आश्रम मठ पक्ष कार्यालय यांना सुविधा ची गरज नाही तर ज्या शाळेतून महाविद्यालयातून हजारो विध्यार्थी विध्यार्थिनी बदलत्या काळानुसार उच्च शिक्षण घेऊन समाजासाठी राष्ट्रासाठी योगदान देतील त्या शाळा महाविद्यालय गरिबांना उपेक्षित घटकांना जागा उपलब्ध करुन देण्याची निकडं निर्माण झाली आहे

अनेक मंदिरे आश्रम यांच्याकडे हजारो एकर जमिनी पडून आहेत त्यातून देशाला गरीब घटकांना त्यांचा काय उपयोग होतो हे विचारात घेतल पाहिजे आदिवासी लोक पिढ्यानं पिढ्या जंगलात पाड्यावर रहातात पण त्यांचे जगण्याचा स्तर राहणीमान काय आहे केंद्रातील सरकार कितीही वलग्ना करो पण उपेक्षित घटक यांना त्यांचा रहाण्याचा जगण्याचा शिक्षणाचा व आर्थिक स्तर जोपर्यंत उंचावत नाही तोपर्यंत भारत महासत्ता बनण्याची आशा धुसर आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button