अतिक्रमण व रस्त्याच्या मेसेज बाबत काही टपरीधारक दुकानदार यांच्यात नाराजी आहे काहींनी उपरोधीक प्रतिक्रिया दिल्या

बी.टी.शिवशरण
श्रीपूर मधून अवजड वहाने बेफाम चालवली जात असल्या बाबत व काही टपरीधारक व काही दुकानदार यांनी आपल्या मूळ जागेपेक्षा दुकानासमोर अतिक्रमण केल्यामुळे सदर रस्ता अरुंद झाल्याने दररोज रहदारीची कोंडी होते लहान मोठे अपघात होण्याची शक्यता या बाबत मीं बातमी केली होती यामध्ये सर्वच टपऱ्या दुकानें काढली जावीत हा उद्देश नव्हता ज्यांनी अतिक्रमण करुन रस्त्याला अडथळे निर्माण केलेत
ते केलेले अतिक्रमण काढून रस्ता मोकळा व्हावा ही अपेक्षा आहे सामाजिक भान जबाबदारी याचे मला पत्रकार म्हणून आकलन आहे मीही श्रीपूरचा प्रथम नागरिक आहे नंतर पत्रकार म्हणून मीं माझी जबाबदारी या नात्याने सदर विषय मांडला आहे कोणाचे नुकसान व्हावे धंदे बंद पडावेत हा हेतू नाही पण आपल्यामुळे गावाला त्रास होत असेल तर ज्यांनी अतिक्रमण केले ते काढण्याची नैतिक जबाबदारी सम्बधितानी का घेऊ नये

आपल्यामुळे इतरांवर अतिक्रमण काढण्याची वेळ कोणी कोणावर का येऊ दिली याचेही आत्मचिंतन प्रथम करावे मग ही बातमी लिहण्याची वेळ येणार नाही सगळ्यांनीच अतिक्रमण केलेले नाही पण ज्यांनी केले आहे त्यांच्यामुळे सर्वांची उठकळा येणार तर नाहीना हे व्यवसाईकांनी विचार करावा.श्रीपूर मध्ये प्रत्येक दुकानापुढे वहाने असताव्यस्त लावलेली असतात त्यामुळेही रहदारीची कोंडी होते प्रत्येकानी स्वतःपुरते न पहाता इतरांचाही विचार करावा हीच अपेक्षा



