महाराष्ट्र

ड्रोनद्वारे रात्रीच्या वेळी शेती व गावावर टेहळणी, पिंपरी पंचक्रोशीतील शेतकरी, नागरीक भयभीत, चोऱ्यांचे सत्र सुरूच, पोलीसांपुढे मोठे आव्हान

बावडा प्रतिनिधी मोहंमद कैफ तांबोळी, मोबाईल – 8378076123

पिंपरी बुद्रुक पंचक्रोशीतील गावे व शेतीवर रात्रीच्यावेळी ड्रोनची टेहळणीने नागरीक व शेतकरी भयभीत. शेतकऱ्यांना रात्र जागून काढावी लागत आहे. पिकांबरोबर मोटार, केबल, शेळ्या, मोटारसायकल चोऱ्यामुळे आर्थिक नुकसानीचे सत्र. सदरचा छडा लावण्याच्या नागरिकांच्या मागणीने पोलीसांपुढे आव्हान.

पिंपरी बुद्रुक पंचक्रोशीतील नरसिंहपूर, गिरवी, टणू, गोंदी, ओझरे, लुमेवाडी, गणेशवाडी, टाकळी, गारअकोले गावातील व शेतातील उभ्या असणाऱ्या डाळींब बागांवर मागील पंधरा ते वीस दिवसांपासून रात्रीच्या आठ वाजल्यापासून ते दोन वाजेपर्यंत ड्रोनच्या माध्यमातून टेहळणी केली जात आहे. त्यामुळे नागरीक व शेतकऱ्यांच्या मनात याची मोठी दहशत निर्माण झाली आहे. अनेकदा तर डाळींब बागांजवळून चोरांना पळवून लावण्यात आले आहे.

रात्रीच्या वेळी ड्रोनच्या माध्यमातून टेहळणी केली जात असल्याचे शेतकरी केशव बोडके, सोमनाथ मगर, विष्णू काटकर, पोपट डिसले, गणेश जगताप, पोपट बोडके, छगन देशमुख, खंडू मगर, गणेश क्षिरसागर, गोपाळ मगर, हनुमंत जगदाळे, शरद जगदाळे, वसंत तावरे यांनी सांगितले. ड्रोन डाळींब बागांवर ५० फुटांवर खाली घेतले जात आहे. याच कालावधीत छगन देशमुख यांच्या एक टन डाळिंबाची चोरी करण्यात आली आहे. तर पिकांबरोबर मोटार, केबल, शेळ्या, मोटारसायकल, बोकड चोऱ्यामुळे आर्थिक नुकसान होत आहे.

दरम्यान बावडा दुरक्षेत्रचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील यांना सदर बाबत विचारले असता त्यांनी सांगितले की, आम्ही त्याचा छडा लावण्याचा प्रयत्न करत आहे. ज्या माध्यमातून ड्रोन आणून उडवले जाते त्या गाडीची माहिती मिळवण्यात आली आहे. चोरीच्या उद्देशानेच ड्रोनची टेहळणी सुरू असल्याचे दिसत आहे. शेतकऱ्यांनी रात्री समूह करून आळी पाळीने आपल्या डाळींब बागांची राखण करावी. आम्हीही रात्रीची गस्त सुरू करत आहे. तसे काही कळाल्यास पोलीसांशी संपर्क करावा.

सदर डाळींब बागांमध्ये लाईटचा उजेड करण्यासाठी सिंगल फेजतरी लाईटची गरज आहे. पण पिंपरी बुद्रुक विज उपकेंद्रातून सर्वत्र टू-फेज विज दिली जाते परंतू गिरवी फाट्याला कायमच वंचित ठेवले जात आहे. यामागे नेमका कोणाचा हात असेल याची सखोल चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

चौकटदरम्यान डाळींब उत्पादक शेतकऱ्यां पैकी काही शेतकऱ्यांकडे परवान्याची बंदुक आहे. त्यामुळे आताजरी ड्रोन फिरायला लागले तर मात्र त्याला बंदुकीच्या फैरीच्या माध्यमातून पाडणार असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. तर याच लवकरच बंदोबस्त करून शेतकऱ्यांना दहशतमुक्त करावे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button