महाराष्ट्र

मोहोळकरांच्या सिकंदर शेख ने पटकावला यंदाचा “रुस्तुम ए हिंद” किताब…

🎯 अशी कामगिरी करणारा चौथा महाराष्ट्रीयन पैलवान…

आमीर मोहोळकर
प्रतिनिधी,टाइम्स 9 न्यूज,अकलूज
9890299499

“महाराष्ट्र केसरी” मल्ल सिकंदर शेख ने पंजाबमध्ये झालेल्या स्पर्धेत बाजी मारत ‘रुस्तम-ए-हिंद’ या मानाच्या किताबावर आपले नाव कोरले.हा किताब जिंकणारा सिकंदर हा महाराष्ट्रातील चौथा पैलवान ठरला,हे विशेष…

गतवर्षी म्हणजे 2023 ला सिकंदर शेखने ‘महाराष्ट्र केसरी’ कुस्ती जिंकून 66 वा महाराष्ट्र केसरी होण्याचा बहुमान मिळविला होता.त्याच्या कुस्तीमधील पुढील कारकीर्दीसाठी पुण्यातील ‘पुनित बालन ग्रुप’ने सर्वतोपरी मदत करण्याचा निर्णय घेतला होता.त्यानुसार सिकंदर शेखने त्यांच्याशी सामंजस्य करार झाला आहे.या मदतीच्या आधारे शेख याची विविध कुस्ती स्पर्धांत भाग घेण्याची आणि त्यात विजय मिळविण्याची घोडदौड जोमाने सुरू असून त्यात आणखी एका मोलाच्या किताबाची भर पडली आहे…

पंजाबमधील जांडला (जि. जालंधर) येथे नुकतेच रुस्तम-ए-हिंद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.त्यात देशातील अनेक नामवंत मल्लांनी सहभाग घेतला होता,मात्र त्यांना धूळ चारत सिकंदर शेख याने रुस्तम-ए-हिंद हा किताब पटकाविला.रुस्तम-ए-हिंद या किताबावर नेहमीच उत्तर भारतीय मल्लांचे वर्चस्व पाहायला मिळाले आहे.त्यात केवळ पै. हरिश्चंद्र बिराजदार,अमोल बुचडे आणि असाब अहमद याच महाराष्ट्रीयन मल्लांनी हा किताब जिंकलेला आहे.त्यांच्यानंतर आता सिकंदर शेख हा किताब जिंकणारा महाराष्ट्रातील चौथा मल्ल ठरला आहे.या स्पर्धेत सिकंदरच्या रोशन किरलगड आणि बग्गा कोहली यांच्यासोबत झालेल्या कुस्त्या रोमहर्षक आणि पाहण्यासारख्या होत्या.अंतिम स्पर्धेत सिकंदर विरुद्ध बग्गा कोहली यांच्यात कुस्ती झाली. यात सिकंदर विजयी झाला.त्याला बक्षीस म्हणून मानाची गदा,ट्रॅक्टर या बक्षिसाबरोबरच आर्थिक स्वरूपातही बक्षिस मिळाले आहे…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button