निमगाव केतकी येथील पोस्ट ऑफिसचे उल्लेखनीय काम : गणेश काका घाडगे
इंदापूर प्रतिनिधी समिर शेख मो.नं. :- 9766863786
इंदापूर : मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना राज्यातील महिला व मुलींना स्वावलंबी आत्मनिर्भय करण्यासाठी तसेच महिला आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या मुलांच्या आरोग्य आणि पोषण स्थितीत सुधारणा व्हावी यासाठी राज्य सरकारचे महत्वपूर्ण योजना आर्थिक दुर्बल घटकातील महिलांच्या बँक खात्यात प्रति महिना दीड हजार रुपये जमा होणार परंतु राष्ट्रीयकृत बँक खाती आहेत केवायसी नाही केवायसी अपडेट झाला तरी पैसे येत नाहीत निमगाव केतकी तील गावाची लोकसंख्या पाहता गावात दोनच बँक आहेत सतत तांत्रिक अडचणी सांगितल्या जातात परंतु सर्वसामान्य महिलांना विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी हे खाते उपयुक्त आहे.
यासाठी निमगाव केतकी पोस्टाने मोलाची कामगिरी बजावली आहे निमगाव केतकी येथील पोस्ट ऑफिस चे काम पाहता दररोज 200 खाते उघडली जातात खाते उघडले की ते लगेचच आधार लिंक होते आजपर्यंत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत संबंधित माहिती घेतली असता निमगाव केतकी व परिसरातील दीड हजार खाते उघडले आहेत अशी माहिती पोस्ट ऑफिसर एस डी रासकर दीपक सावंत नवनाथ मिसाळ सुरेश कुंभार विठ्ठल गुरव या अधिकाऱ्यांनी दिली सदर पोस्ट ऑफिसच्या कार्याची दखल घेता गावातील तंटामुक्तीचे अध्यक्ष अतुल आप्पा मिसाळ एडवोकेट सुभाष भोंग निमगाव केतकी चे पोलीस पाटील अतुल डोंगरे गणेश झळक महादेव भोंग पांडुरंग तात्या भोंग उपस्थित महिला वर्ग व ग्रामस्थ यांनी पोस्ट ऑफिस मधील अधिकाऱ्यांचे अभिनंदन केले