महाराष्ट्र

शिवसेना उपतालुका प्रमुख पदी डॉक्टर गौतम रोडे यांची नियुक्ती

करमाळा प्रतिनिधी अलीम शेख मोबाईल नंबर 98 50 68 63 60

दुग्ध व्यवसायातील प्रसिद्ध उद्योगपती डॉक्टर गौतम रोडे यांची शिवसेना उपतालुकाप्रमुख पदी युवा सेनेचे सचिव किरण साळी यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन नेमणूक करण्यात आली
यावेळी शिवसेना प्रवक्त्या ज्योतीताई वाघमारे करमाळा तालुका संपर्कप्रमुख रवी आमले शिवसेना जिल्हाप्रमुख महेश चिवटे
उपजिल्हाप्रमुख अनिल पाटील तालुकाप्रमुख राहुल कानगुडे शहर प्रमुख संजय शीलवंत युवा सेना तालुकाप्रमुख नवनाथ गुंड महिला आघाडी उपजिल्हाप्रमुख ज्योतीताई शिंदे महिला आघाडी जिल्हा समन्वयक माढा विभाग पद्मजा इंगवले
युवा सेना प्रमुख महादेव सूर्यवंशी
ओबीसी आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुरेश करचे
ओबीसी आघाडीचे तालुकाप्रमुख सुनील विटकर
शहर प्रमुख अंकुशराव जाधव आदी पदाधिकारी उपस्थित होते

डॉक्टर गौतम रोडे आळजापूर येथील रहिवासी असून त्यांचे करमाळा एमआयडीसीतील दूध संकलन केंद्र असून दररोज पन्नास हजार लिटर दूध संकलन करतात दूध उत्पादक शेतकऱ्यांचा चांगला कॉन्टॅक्ट असून स्वतः ते जनावरांचे डॉक्टर आहेत
अल्प दरात जनावर उपचार करणारे डॉक्टर म्हणून ते शेतकऱ्यांवर प्रसिद्ध आहेत
आज त्यांनी आपल्या समर्थक कार्यकर्ते व पंधरा दुध संस्थेच्या चेअरमन शिवसेनेत प्रवेश केला

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विचार पटल्यामुळे आपण शिवसेनेत प्रवेश करत असून येणारा विधानसभेत करमाळा तालुक्यातील धनुष्यबाणाचा उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे यावेळी नूतन उपतालुकाप्रमुख डॉक्टर गौतम रोडे यांनी सांगितले

करमाळा तालुक्यातील जनता स्वार्थी नेतेमंडळींच्या गटातटाचे राजकारणाला कंटाळली असून याला आता स्वतंत्र स्वाभिमानी पर्याय म्हणून
महेश चिवटे यांना विधानसभेत पाठवण्यासाठी तालुका ढवळून काढणार असा दावा नूतन तालुकाप्रमुख डॉक्टर गौतम रोडे यांनी केला आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button