शहर
श्री चंद्रशेखर विद्यालयात प्रवेश फी तीन वेळा.पालकांची शिक्षण मंत्री व वरिष्ठांकडे तक्रार

बी.टी.शिवशरण
श्रीपूर:येथील श्री चंद्रशेखर विद्यालय व नारायणकाका आगाशे ज्युनिअर महाविद्यालय मध्ये प्रवेश फी तीन वेळा घेतली जाते विशेष म्हणजे ही संस्था एकच आहे पण प्रवेश घेताना पहिलीला प्रवेश घेताना फी घेतली जाते पहिली ते चौथी पर्यंत प्राथमिक विभाग पुन्हा त्याच संस्थेत पाचवीला प्रवेश घेताना दुसरी फी नंतर त्याच संस्थेच्या नारायण काका आगाशे कनिष्ठ महाविद्यालयात अकरावीला प्रवेश घेताना तीसरे वेळीं प्रवेश फी घेतली जाते

वास्तविक पहाता ही सर्वसामान्य व गोरगरीब पालकांची लूट आहे याबाबत शिक्षण मंत्री व सोलापूर जिल्हा शिक्षण अधिकारी यांच्या कडे तक्रार दाखल करणार असल्याची माहिती श्रीपूर मधील विविध संस्था तसेच सामाजिक कार्यकर्ते यांनी दिली आहे शाळा एक संस्था एक मग प्रवेश देताना तीन वेळा फी देणगी या नावाने पालकांची लूट कश्यासाठी असा सवाल विचारला जात आहे