ना भूतो ना भविष्यतो महेश शिंदे वाढदिवसानिमित्त २४० रेकॉर्ड ब्रेक रक्तदान..
टाईम्स 9 मराठी न्युज नेटवर्क
मैत्री प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्यच्या वतीने संघटनेचे संस्थापक अध्यक्ष महेश शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य दिव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते या शिबिरामध्ये सर्व युवा सहकारी, मित्र परिवार, ज्येष्ठ मार्गदर्शक अशा सर्वांच्या सहभागातून रेकॉर्ड ब्रेक तब्बल २४० ब्लड बॅग आपण संकलित करण्यात आल्या.
सर्वसामान्य कुटुंबातील सामाजिक कार्यकर्ते च्या वाढदिवसानिमित्त यातून महेश शिंदे यांचे कार्य व जनतेमध्ये असणारे लोकप्रियता समजते. यावर महेश शिंदे म्हणाले की मैत्रीच्या जीवावर आणि सामाजिक कार्याच्या पोचपावतीवर मी एवढा उच्चांक गाठू शकलो.इतरांचे जीवन समृद्ध आणि अधिक चांगले करण्यासाठी, आपण दिलेल्या अमूल्य योगदानाबद्दल तुमचे ऋणी आहोत. तुमच्या रक्ताचा एक थेंब इतका मौल्यवान असू शकतो याची कल्पनाही केली जाऊ शकत नाही. आपण केलेल्या सहकार्याबद्दल आणि गोरगरीब रुग्णांना मदत करता येणार आहे त्याबद्दल सर्व रक्तदात्याचे आभार.
यावेळी सामाजिक व राजकीय क्षेत्रातील सर्व ज्येष्ठ नेते मंडळी मित्रपरिवारांनी उपस्थिती लावून शुभेच्छा दिल्या.तसेच परिश्रम घेण्यासाठी मैत्री प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्याचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते तसेच सह मित्रपरिवार सामाजिक क्षेत्रातील राजकीय क्षेत्रातले मित्र बांधव आदी उपस्थित होते.