हातकणंगले लोकसभा : खासदारकी राजू शेट्टी की धैर्यशील माने? मतदारसंघात सध्या काय विचारांचा धुमाकूळ आहे?

सांगली जिल्हा प्रतिनिधी : आनंद सावंत, टाईम्स 9 मराठी न्यूज, मो. 8007932121
2024 राजू शेट्टी की धैर्यशील माने गाव कट्यावरच्या चर्चा उधाण
हातकणंगले लोकसभा म्हणजेच पूर्वीचा इचलकरंजी लोकसभा मतदारसंघ. कोल्हापूर जिल्हा-पंचगंगेचा ऊसपट्टा, सांगली जिल्हा कृष्णा ऊसपट्टा प्रामुख्याने शिराळा वाळवा तालुका, या मतदारसंघाचा प्रमुख भाग.
अनेक वर्ष कॉंग्रेस अन् पुढे राष्ट्रवादीने या मतदारसंघावर राज्य केलं. विशेषतः बाळासाहेब माने, त्यांची सून निवेदिता माने आणि आता त्यांचे नातू धैर्यशील माने हे शिवसेना मधून लडले. या माने घराण्याने हातकणंगले लोकसभा वेळोवेळी जिंकली.

या ऊसपट्ट्याच्या मतदारसंघाला राष्ट्रीय ओळख मात्र मिळाली ती स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत यांनी मिळवलेल्या अनपेक्षित विजयामुळे.
कोणताही आर्थिक वा राजकीय पाठिंबा नसताना साखर सम्राटांच्या या बालेकिल्ल्याला राजू शेट्टी आणि त्यांना खंबीर साथ लाभली ते सदाभाऊ खोत यांची त्यामुळे यांनी दोन वेळा हादरा दिला आणि शेतकऱ्यांची ताकद संसदेत पोहचवली. मात्र याच राजू शेट्टी यांचा झंझावात गेल्या निवडणुकीत निष्प्रभ ठरला. हे कसं घडलं? काय आहेत या गुंतागुंतीच्या मतदारसंघातील राजकीय गणितं? जाणून घेऊ या लेखातून.
तर हातकणंगले मतदारसंघ हा तसा काँग्रेसच्या विचारधारेचा म्हणता येईल. म्हणजे 1977 ते 1991 अशा पाच टर्म काँग्रेसच्या बाळासाहेब माने यांनी इथूनच बाजी मारली होती. त्यानंतर काँग्रेसकडून कल्लाप्पा आवाडे यांनी दोनदा विजय मिळवला.
पुढे जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली तेव्हा बाळासाहेब माने यांची सून निवेदिता माने दोनदा खासदार झाल्या.
एकीकडे भाजपने बॅकअप प्लॅन म्हणून महायुतीची ताकद वाढवण्यास सुरूवात केली आहे. भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष, इचलकरंजीचे माजी आमदार सुरेश हाळवणकर हे लोकसभेसाठी इच्छुक असल्याची चर्चा आहे. मात्र भाजप हा ऐन वेळेला मोठा धमाका करू शकतो हा आजपर्यंतचा त्यांच्या राजकारणाचा इतिहास आहे.
सध्याचं चित्र पाहता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या विरोधात विद्यमान खासदार धैर्यशील माने लढत देणार हे उघड आहे. त्यांच्या बरोबरीनेच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे पुत्र प्रतीक पाटील, भाजपाला पाठिंबा दिलेले अपक्ष आमदार प्रकाश आवाडे यांचे पुत्र राहुल आवाडे, जनसुराज्य शक्ती पक्षाचे आमदार विनय कोरे, शाहूवाडी तालुक्यातून काँग्रेसचे दिवंगत खासदार उदयसिंगराव गायकवाड यांचे नातू जिल्हा बँकेचे संचालक रणवीरसिंग गायकवाड अशी मात्तबर नावं उमेदवारीसाठी पुढे येत आहेत