विकास कामांना प्राधान्य देणाऱ्या खासदाराच्या प्रतीक्षेत सोलापूर ची जनता…

आमीर मोहोळकर
प्रतिनीधी,टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क,अकलूज
गेली दहा वर्षे विकासात्मक खासदाराच्या प्रतीक्षेत असलेल्या सोलापूर लोकसभा मतदार संघातून यंदा कुणा कुणाला खासदारकीची उमेदवारी जाहीर होतेय आणि निवडून येणारा खासदार हा सोलापूर चा मागील दहा वर्षाच्या विकास कामांचा बॅकलॉग भरून काढेल का,अशा संभ्रम अवस्थेत असलेल्या सोलापूर लोकसभा मतदार संघातील जनता या वेळी कुठ्ल्या पक्षाच्या उमेदवाराला आशीर्वाद देते,हे पाहणे आवश्यक असणारं आहे…
तसे पहायला गेल्यास गेली दहा वर्षे केंद्रात सत्तेत असलेल्या मोदी सरकार ने संबंध भारता मध्ये जे विकासात्मक धोरण आखले त्या धोरणपासून वंचित राहणारी सोलापूर लोकसभा मतदार संघातील जनता या वेळी काय निर्णय घेते हे सुद्धा पाहणे महत्वाचे ठरणार आहे…

2014 साली शरद बनसोडे या राजकारणातील नवख्या खासदारा ला निवडून दिल्या नंतर आणि त्याच वेळेस केंद्रात मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर सोलापूर लोकसभा मतदार संघ विकासाच रोल मॉडेल व्हायला काहीच हरकत नव्हती,परंतु सोलापूरकर या बाबतीत दुर्दैवी ठरले,असो…
त्या अर्थाने 2019 साली मोदी लाटेत हि सोलापूर लोकसभा मतदार संघाने एका स्वामींच्या झोळीत मत रुपी आशिर्वाद देउन हि तमाम सोलापूरकर अजुन हि विकासा पासुन कोसो दुर असल्याचे जनतेतून बोलले जात आहे…
या वेळेस भारतीय काँग्रेस ने सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या आणि सोलापूर शहर मध्य च्या आमदार प्रणिती ताई शिंदे यांना उमेदवारी जाहीर केली आहे अन् इकडे गेली दहा वर्षे केंद्रात सत्तेत असलेल्या मोदी सरकारला सोलापूर च्या जनतेने जिल्ह्यातून 11 पैकी 7 आमदार आणि 2 खासदार निवडून देउन देखील स्थानिक,अभ्यासु,आणि विकासाचा दृष्टिकोन असलेल्या उमेदवाराचा शोध लागत नसेल तर याच्या शिवाय दुसरी शरमेची बाब असुच शकत नाही…असो तरी हि सोलापूर लोकसभे ची निवडणुक हि परंपरागत विरोधी असणाऱ्या काँग्रेस आणि भाजपा मध्ये होईल यात शंका नाही…