महागाईचे आव्हान कायम :-रिझर्व्ह बँक
टाईम्स 9 मराठी न्युज नेटवर्क
अन्नधान्याच्या किमतीतील वाढीच्या जोखमीमुळे महागाई वाढण्याची शक्यता असल्याने व्याजदराबाबत सावध धोरण स्वीकारल्याचे रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी म्हटले आहे. बँकेने जाहीर केलेल्या फेब्रुवारीच्या पतधोरण समितीच्या (एमपीसी) बैठकीचे इतिवृत्त जाहीर करण्यात आले.त्यावेळी दास बोलत होते.
या महिन्याच्या सुरुवातीला जाहीर करण्यात आलेल्या द्वैमासिक पतधोरणात रिझर्व्ह बँकेने मुख्य व्याजदर जैसे थे ठेवले आहेत. धोरणात्मक आघाडीवर घाईघाईने कोणतेही पाऊल उचलल्यास आतापर्यंत केलेले यशस्वी प्रयत्नही धोक्यात येण्याची शक्यता आहे.
भू-राजकीय तणाव, साखळी पुरवठ्यावरील अडथळे यामुळे अन्नधान्याच्या दरातील अस्थिरता आणि महागाईची टांगती तलवार कायम आहे, असेही दास म्हणाले. पतधोरण मर्यादित ठेवून महागाईचा दबाव कमी केला पाहिजे, असे मत रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर मायकल देबब्रत पात्रा यांनी व्यक्त केले.